Domino's Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Domino's Viral Video : आधी नाकात बोट आणि मग मळलं पीठ; डॉमिनोजच्या कर्मचाऱ्याचा किळसवाना प्रकार कॅमेऱ्यात कैद

Japan Video Viral: या व्यक्तीने केलेला किळसवाना प्रकार आणखी एक जण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहे. तसेच आपला व्हिडीओ काढला जातोय हे देखील किळसवाणं कृत्य करणाऱ्या व्यक्तीला माहिती आहे.

Ruchika Jadhav

Viral Video:

डॉमिनोजचा भरभरून चीज घातलेला पिझ्झा खायला सर्वांनाच आवडतो. तुम्ही देखील डॉमिनोजमधला पिझ्झा खाल्ला असेल. पिझ्झासाठी डॉमिनोज या कंपनीने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्ही पिझ्झा खाणं कायमचं सोडून द्याल.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती डॉमिनोजचा युनीफॉर्म घालून किचनमध्ये पीठ मळत आहे. पीठ मळताना त्याने अचानक नाकात बोट घातलं आणि त्या बोटांनी त्याने पीठ मळलं. या व्यक्तीने केलेला किळसवाना प्रकार आणखी एक जण आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहे. तसेच आपला व्हिडीओ काढला जातोय हे देखील किळसवाणं कृत्य करणाऱ्या व्यक्तीला माहिती आहे.

कारण हा व्यक्ती कॅमेऱ्यामध्ये पाहून हे सर्व काही करत आहे. सदर घटनेचा व्हिडीओ @Jeffrey J. Hall 🇯🇵🇺🇸 या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सदर व्हिडीओ जपानमधील असून जपान टाईम्सनेच याबाबतचं वृत्त दिलंय.

वृत्तामध्ये डॉमिनोजने या प्रकरणी कारवाई केल्याचं म्हटलं आहे. व्हिडीओ पाहताच डॉमिनोजने हे पीठ फेकून दिलं आहे. तसेच सदर कर्मचाऱ्याला कामावरून कमी केलं आहे. यासह झालेल्या घटनेबाबत आम्ही फामी मागतो, दिलगीरी व्यक्त करतो असं देखील म्हटल्याचं वृत्तात लिहिलंय.

असे असले तरी सोशल मीडियावर हा किळसवाना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. नागरिकांच्या मनात कंपनीबाबत शंका निर्माण झालीये. मात्र कंपनीने फामी मागीतली असून आम्ही सर्व प्रकारे स्वच्छतेची काळजी घेत आहोत असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shinde: 'अंगूरी भाभी' जेलमध्ये जाणार? प्रोड्यूसरवर हरेसमेंटचे खोटे आरोप भोवले, अभिनेत्रीच्या अटकेची मागणी

Pune Hospital: पुण्यातील आरोग्य विभाग 'व्हेंटिलेटर'वर, पालिका रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा; धक्कादायक आकडेवारी समोर

एक नंबरचे स्वार्थी आणि ढोंगी असतात 'ही' माणसं! आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 'या' २ सवयींवरून ओळखा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे दमदार आगमन

Mumbai Crime : मुंबईत भयंकर घडलं! आईच्या बॉयफ्रेंडचं टाळकं सटकलं, अमानुष मारहाणीत ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT