VIRAL VIDEO Saam Tv
व्हायरल न्यूज

Fact Check : एका बाटलीवर एक बाटली दारू फ्री! खरंच दारू स्वस्त झालीय का? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Viral Liquor Video : आता बातमी आहे व्हायरल व्हिडिओची... एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, त्यामध्ये दावा करण्यात आलाय की एकावर एक दारूची बाटली फ्री करण्यात आलीय. त्यामुळे दारू दुकानांवर गर्दी होतेय...दुकानांवरील गर्दीचा व्हिडीओ समोर आलाय. ..मात्र, हा दावा खरा आहे का?... खरंच दारू स्वस्त झालीय का...? याची आम्ही पडताळणी केली... त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Vinod Patil

दारू महाग होवो नाहीतर स्वस्त... दारू पिणार्‍यांची कमी नाही... हा व्हिडिओ पाहा... दारूसाठी दुकानाबाहेर रांगा लागल्यायत... आपला नंबर कधी येतोय आणि आपल्याला बॉटल किती मिळतील हीच कुजबूज ऐकू येतेय...

कारण, एकावर एक फ्री अशी या दारू दुकानदाराने ऑफर ठेवलीय... त्यामुळे तळीराम दारूसाठी तुटून पडलेयत... जे एक बॉटल घेणारे फ्रीवाल्या ऑफरमुळे बॉक्स बॉक्स घेऊन चाललेयत... बघा, या व्यक्तीच्या चेहर्‍याकडे... आपल्याला स्वस्तात दारूचा अख्खा बॉक्स मिळाल्याचं समाधान त्याच्या चेहर्‍यावर दिसतंय... मात्र, रांगेत उभे असलेले टेन्शनमध्ये आलेयत... बॉक्स बॉक्स दारू सगळेच घेऊन जाऊ लागले तर आपल्यासाठी शिल्लक राहिल ना? हाच विचार यांच्या मनात येत असावा...हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने नेटकरीही पत्ता विचारतायत... त्यांनाही उत्सुकता लागलीय की एकावर एक फ्री ऑफर का लावलीय...? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने याची सत्यता सांगणं गरजेचं आहे...

दारू ही आरोग्यास हानिकारक आहे...आम्हीही याचं समर्थन करत नाही... मात्र, हे दुकान आहे तरी कुठलं...? आपल्या महाराष्ट्रातील हा व्हिडीओ आहे का...? हे जाणून घ्यायची इच्छा अनेकांना असावी... त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली... व्हिडिओसोबतच्या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

बघा, दारू एकावर एक फ्री केल्यावर दुकानांवर गर्दी झालीय.लोक बॉक्स घेऊन जात असल्याने स्टॉक लगेच संपतोय. हा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होतोय... त्यामुळे आम्ही या व्हिडीओची पडताळणी सुरू केली... याबाबत अधिक माहिती वाईन शॉप्सवरच मिळू शकते... आमचे प्रतिनिधींनी याबाबत माहिती मिळवली असता, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर आलं...

उत्तर प्रदेशच्या नोएडातील हा व्हिडिओ

अलीकडे ई-लॉटरीद्वारे दुकानांचे वाटप झाले

जुन्या दारू दुकानांचा ई-लॉटरीत नंबर लागला नाही

31 मार्चपर्यंत स्टॉक संपवण्याची अट

दारू संपली नाही तर सरकार जमा केली जाणार

आपलं नुकसान होऊ नये यासाठीच दिल्लीप्रमाणे नोएडातील अनेक दारू दुकानांनी स्टॉक संपवण्यासाठी ऑफर सुरू केली... त्यामुळे दारू घेण्यासाठी रांगा लागल्या...आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील नसून उत्तर प्रदेशातील असल्याचं समोर आलं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Vidyarthini Yojana: लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना; दर महिन्याला ५०० रुपये मिळणार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या सातपूर परिसरातील लैंगिक शोषण प्रकरणात फॉरेन्सिक टीमकडून तपासणी

Akola : अकोल्यात दिवसाढवळ्या गँगवॉर; तिघांवर धारदार शस्त्राने सपासप वार, पहा थरारक Video

Saffron Benefits in Pregnancy : प्रेग्नंसीत केशर खाल्ल्याने बाळ गोरं होतं का? डॉक्टर काय सांगतात जाणून घ्या

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

SCROLL FOR NEXT