Aadhaar Card 
व्हायरल न्यूज

Aadhaar : आधारकार्ड बंद होणार? कागदपत्रांची कटकट कायमची संपणार? व्हायरल मसेजमागचं सत्य पाहा

Aadhaar Card viral massage : आधारकार्ड सगळेच जण वापरतात. कायदेशीर पुरावा म्हणून आधारकार्डकडे पाहिलं जातं. मात्र आता हेच आधारकार्ड बंद होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय.

Vinod Patil

Aadhaar Card : तुम्ही आम्ही सरकारी पुरावा म्हणून आधार कार्ड देतो. आधार कार्ड ही आपली ओळख असते. मात्र आता हे आधारकार्ड लवकरच बंद होणारंय. हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियात तसा मेसेज व्हायरल होतोय. नेमकं काय आहे सत्य ?पाहूयात....

आधारकार्ड सगळेच जण वापरतात. कायदेशीर पुरावा म्हणून आधारकार्डकडे पाहिलं जातं. मात्र आता हेच आधारकार्ड बंद होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. सरकार आधारकार्ड बंद करण्याची तयारी करतंय असा दावा केला जातोय. त्यामुळे सोशल मीडियात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. खरंच आधारकार्ड बंद होणार का? आधारकार्ड बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्र द्यावी लागणार? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. त्यापूर्वी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात..

व्हायरल मेसेज काय ?

आता तुमचा चेहराच तुमचं आधारकार्ड असणार. कागदपत्रांची सर्व झंझट कायमची संपणार. तुम्हाला कुठेही आधारकार्ड दाखवण्याची गरज पडणार नाही.

हा मेसेज व्हायरल होत असल्यानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच आधार कार्ड बंद होणार असेल तर दुसरा पर्याय काय? आधार कार्ड हा अत्यंत महत्वाचा विषय असल्यानं साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. आमच्या प्रतिनिधींनी काही वेबसाईट्सवरून पडताळून पाहिल्या. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहा...

साम इन्व्हेस्टिगेशन, व्हायरल सत्य

येत्या काळात सेवांचा लाभ घेताना आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. फेस ऑथेंटिकेशन म्हणजे तुमचा चेहरा पाहूनच ओळख पटवली जाईल. अधिक जलद आणि सोप्या पद्धतीनं सेवांचा लाभ देण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. प्रवास, हॉटेल बुकिंग, हेल्थकेअर आणि बँकिंगसारख्या सेवांचा लाभ घेताना आयडी प्रूफ दाखवण्याची गरज भासणार नाही. कॅमेऱ्यासमोर चेहरा दाखवताच पडताळणी होईल. या सर्व प्रक्रियेला नेमका किती वेळ लागेल याची कुठलीही स्पष्टता अद्याप मिळालेली नाही.

आधार प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद व्हावी यासाठी नवे बदल केले जाणार आहेत. त्यामुळे आमच्या पडताळणीत आधारकार्ड बंद होणार हा मेसेज सत्य असल्याचं स्पष्ट झालंय. अर्थात नव्या बदलांना बराच वेळ लागेल. त्यामुळे लगेचच आधार कार्ड बंद होईल असंही नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT