Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: काळ आला होता, पण... टेम्पोतील लोखंडी सळ्या थेट कारच्या काचेत घुसल्या; थरारक व्हिडिओ व्हायरल

kolhapur Shocking Video: कोल्हापुरमधील सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या घटनेत एक भयंकर अपघात घडलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हीही एकदा पाहा.

Tanvi Pol

Car Accident Video: अपघात हा कधी, कुठे, आणि कसे होतील याचा नेम नाही. सध्या याचं एक भयावह उदाहरण नुकतच सोशल मीडियावर समोर आलं आहे. काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे, तो पाहून प्रत्येकजण थरकापून गेला आहे. या व्हिडिओमध्ये एका टेम्पोतील लोखंडी सळई थेट समोरून येणाऱ्या कारच्या काचेत घुसताना दिसते.

धडकी भरवणारा व्हिडिओ आला समोर

व्हायरल(Viral) होत असलेल्या या व्हिडिओत एक वाहन रस्त्यावरुन जात असताना दिसत आहेत. अशातच त्या रस्त्यावरुन एक चारचाकी वाहन आणि एक दुचाकीस्वार रस्ता ओलांडत असतात. त्याच वेळी त्या रस्त्यावरुन सरळ दिशेने येत एक टेम्पो येत असतो आणि त्या टेम्पोमध्ये लोखंडी सळ्या असतात. चारचाकी वाहन मध्ये आल्याने टेम्पोवाल्याने अचानक ब्रेक लावला.

अचानक बेक्र लावल्याने त्या टेम्पोमधील लोखंडी सळ्या थेट कारच्या काचेत खुसळ्या. नशीब म्हणजे, कारमधील चालकाला गंभीर दुखापत झालेली नसून किरळोळ जखमी झालेला आहे. संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला असून सोशल मीडियावर हे फुटेड वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.

ही घटना कोल्हापुरमधील असल्याचे समजत आहे. हा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर आल्यानंतर नेटिझन्सकडून प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''नक्की कोणाची चुक झाली ते समजले नाही'' तर दुसऱ्या यूजरने,''कार चालकाची चुकी म्हटलं आहे'' शिवाय काही यूजर्संनी,''टेम्पो चालकाची चुकी म्हटली आहे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: आगळा-वेगळा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

Shocking: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, २ महिलांचे केस कापून अर्धनग्न करत धिंड काढली

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा थरार, ३ मोठे ट्रक उलटले; २ जणांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

भाजप युवा मोर्चा अध्यक्षाचं भीषण अपघातात निधन; पक्षातील दिग्गज नेते निवासस्थानी दाखल, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT