IPL Cheerleaders  Twitter
व्हायरल न्यूज

IPL 2023 Cheerleaders: आता तर हद्दच पार! सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकाने चियर लीडर सोबत केलं लाजिरवाणं कृत्य ; VIDEO व्हायरल

IPL Viral Video: आयपीएल २०२३ स्पर्धेत एक अशी देखील घटना घडली आहे. जी चाहते विसरू शकणार नाही

Ankush Dhavre

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. मात्र काही वाद झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.काही दिवसांपूर्वीच गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता.

काल जयपूरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात शेवटच्या चेंडुवर अब्दुल समदने खणखणीत षटकार मारला आणि सनरायझर्स हैदराबाद संघाला विजय मिळवून दिला.

हा रोमांचक सामना क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाही. दरम्यान आयपीएल २०२३ स्पर्धेत एक अशी देखील घटना घडली आहे. जी चाहते विसरू शकणार नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात काही प्रेक्षक चियर लीडर्सचा अपमान करताना दिसून येत आहेत.

मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांनी थेट चियर लीडर्ससोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या कृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

चियर लीडर्स हे सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याचे काम करत असतात. मात्र काही प्रेक्षक त्यांच्यासोबत अभद्र भाषेचा वापर करून बोलतात. असाच काहीसा प्रकार जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर घडला आहे. (Latest sports updates)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघातील खेळाडूंचा उत्साह वाढवणारे चियर लीडर्स मैदानात जाण्यासाठी सज्ज होत आहेत.

त्यावेळी सामना पाहण्यासाठी आलेले काही प्रेक्षक त्यांना आवाज देऊन त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. चियर लीर्डसने पाहताच एक व्यक्ती म्हणतो की, 'आम्ही तर तुम्हालाच पाहण्यासाठी येतो. मॅच तर आम्ही टी.व्हीवर सुद्धा पाहू शकतो. लाईन देतेस मला.. कधी हँडसम मुलगा नाही पाहिला का?..'

हा व्हिडिओ राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यातील आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने ९ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला होता. कारण राजस्थान रॉयल्स संघाचा डाव अवघ्या ११८ धावांवर संपुष्टात आला होता. राजस्थान रॉयल्स संघाकडून संजू सॅमसनने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली होती. तर या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाने १३.५ षटकात हे आव्हान पूर्ण केले आणि गुजरात टायटन्स संघाला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT