Viral video claiming massive investment returns exposed as misleading; experts warn against financial scams. 
व्हायरल न्यूज

Investment Scheme:भरघोस रिटर्न्ससाठी सरकारची नवी योजना? 22 हजार गुंतवा, साडेतीन लाख कमवा?

Investment Scheme: एका व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, २२,००० रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही दरमहा ३.५ लाख रुपये कमवू शकता. या दिशाभूल करणाऱ्या दाव्यामागील तथ्य आणि सत्यता येथे जाणून घेऊ.

Sandeep Chavan

  • व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचं स्पष्ट

  • सरकारकडून अशी कोणतीही योजना जाहीर नाही

  • नागरिकांनी अशा स्कॅमपासून सावध राहण्याची गरज

ऐकलंत. 22 हजार रुपये गुंतवा आणि महिन्याला साडे तीन लाख रुपये मिळवा, असं मोदी सांगत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...मोदींचा हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांनी यावर विश्वास ठेवलाय. 22 हजार गुंतवल्यावर साडे तीन लाख रुपये खरंच मिळतात का? असे अनेकजण प्रश्न विचारतायत.त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली.

पंतप्रधान मोदींचा 1 मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मोदी ही स्कीम कशी आहे ते समजवून सांगत असल्याचं ऐकायला येतंय. कमी पैसे गुंतवून एवढी मोठी रक्कम कशी काय मिळू शकते? अशी कोणती सरकारची योजना आहे? याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही याची पडताळणी सुरू केली. सरकारकडून याबद्दल माहिती मिळवली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

साम इन्व्हिस्टिगेशन

व्हायरल व्हिडिओ दिशाभूल करणारा

मोदींनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ बनवला

22 हजार गुंतवणून साडे तीन लाख देणं अशक्य

पैशांचं आमिष दाखवून फसवणूक करण्याचा डाव

हे प्रकरण डीपफेक्स तंत्रज्ञानाच्या गैरवापराचे एक गंभीर उदाहरण आहे.एआयचा वापर करण्यात आलाय.मोदींच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि आवाज पूर्णपणे वास्तविक वाटावेत यासाठी बदलले जातात. या व्हिडिओमध्ये, जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि आर्थिक नुकसान पोहोचवण्यासाठी पंतप्रधानांचा आवाज एआय वापरून बदलण्यात आला.तंत्रज्ञानाचा गैरवापर करून असे व्हिडिओ बनवले जातात. त्यामुळे तुम्ही अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका.आमच्या पडताळणीत 22 हजार गुंतवल्यावर दरमहा साडे तीन लाख मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात उष्णतेचा कहर, विदर्भात तापमान ४५ पेक्षा जास्त

IPL 2026 मधील सर्वात जबरदस्त सामना; अवघ्या ३९ चेंडूंत RCBने मिळवला विजय,पॉईंट्स टेबल बेंगरुळुची भरारी

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

SCROLL FOR NEXT