Animal Viral Video:  Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: काय ते कौतुक! थाटामाटात साजरं केलं श्वानाचं डोहाळे जेवण; सेलिब्रेशनचा VIDEO एकदा पाहाच

Animal Viral Video: सध्या प्रत्येकाच्या घरी आपल्याला कुत्रा ,मांजर तसेच कासव असे अनेक प्राणी पाळलेले दिसून येतात. अशातच व्हायरल व्हिडिओ होत आहे,ज्यामध्ये हौसी परिवाराने कुत्र्यांच्या डोहाळ जेवणाचा थाट रचला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dog Baby Shower

सध्या प्रत्येकाच्या घरी आपल्याला कुत्रा ,मांजर तसेच कासव असे अनेक प्राणी पाळलेले दिसून येतात. घरातील इतर सदस्यांची ज्याप्रमाणे काळजी घेतली जाते त्याप्रमाणे घरातील प्राण्यांची काळजी घेण्यात येते. सोशल मीडियावर आपण अनेक प्राण्यांशी निगडित व्हिडिओ पाहत असतो,ज्यामध्ये प्राण्यांच्या वाढदिवसापासून त्यांना घरात आणतानाच्या स्वागताचे व्हिडिओ असतात. सध्या सोशल मीडियावर अनोखा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यामध्ये हौसी परिवाराने कुत्र्यांच्या डोहाळ जेवणाचा थाट रचला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, व्हिडिओतील महिला आणि श्वान एका लाकडी बॉक्सच्या आत बसलेले आहेत. बॉक्समध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस परीधान केलेली महिला आहे. तिच्या समोर एक श्वान बसलेली आहे.

सुरूवातीस महिली तिला लाल रंगाची ओढणी गुंडाळते. त्यानंतर ती तिच्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकताना आपल्याला व्हिडिओत दिसते. महिला तिला लाल रंगाचा टिका लावते,तसेच तिच्या पायात बांगड्याही घालते. व्हिडिओच्या शेवटी श्वानाच्या गळ्यात ( i am ready) अशी इग्रंजी अक्षरांत लिहीलेली पाटी लावते.

श्वानांच्या डोहाळे कार्यक्रमाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @osy_remo_the_retriever_007या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. तसेच या अकाऊंटवर अनेक कुत्र्यांचे व्हिडिओ आहेत. सोशल मीडियावर अशा डोहाळ जेवणाचा आगळा वेगळा व्हिडिओ आपण पहिल्यांदाच पाहिला असे हे नक्की.

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. तसेच व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स् मिळाले असून अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअर करण्यात येत आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देत एका यूजरने लिहिलं आहे की,'जनता वेडी झाली' तसंच आणखी एका यूजरने लिहिलं की,'किती गोड.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT