Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video : हीच खरी माणुसकी! भटक्या कुत्र्यासाठी सफाई कामगार महिलेच्या रूपात अवतरला देव; हृदयस्पर्शी VIDEO

Woman Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.ध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून पुन्हा एकदा माणूसकीचे दर्शन झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडिओ हसवायला भाग पडतात तर कधी डोळ्यात पाणी देखील देऊन जातात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतून पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन झाले आहे. या व्हिडीओची तुफान चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माणसापेक्षा काहींचा प्राण्यांवर जीव असतो. खास करून कुत्रा माणसाच्या अतिशय जवळचा प्राणी आहे. आता काही घरं सोडली तर प्रत्येक घरात पाळीव कुत्रा दिसून येतो. परंतु भटक्या कुत्र्यांकडे कुणीही जास्त लक्ष देत नाही. सध्या अशातच स्टेशनवरच्या एका भटक्या तहानलेल्या कुत्र्यांला पाणी पाजतानाचा कामगार महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला दिसते की, रेल्वे स्टेशनवर एक कामगार महिला कचरा स्वच्छ करत आहे. या महिलेने जांभळ्या रंगाची साडी नेसलेली आहे. सफाई करताना त्यांच्यांसमोर कुत्रा येतो. दरम्यान त्यांना समजते की कुत्रा तहानलेला आहे. परंतु कुत्र्याला पाणी कसे पाजावे हे त्यांना सूचत नव्हतं. तेव्हा त्या कचरा उचलणारी सुपली घेऊन जवळंच असणाऱ्या नळाजवळ जाऊन सुपलीत पाणी भरतात आणि कुत्र्याला पाणी पाजतात. व्हिडिओ पाहुन या कामगार महिलेचे कौतुक होत आहे.

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवरील miss_jugaduया अकाऊंटवरील पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,'दयाळुपणा स्वीकारा, करुणा जोपासा आणि एकजुटीने उभे रहा. मानवतेची ताकद आपल्या सामूहिक सहानुभूतीमध्ये आहे'. हा नेमका व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे हे कळू शकले नाही. तसंच रेल्वे स्टेशनवरील प्रवाशाने आपल्या मोबाईमध्ये हा क्षण कैद केला आहे.

व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे की,'या काकू किती दयाळू आहेत' तर आणखी एका यूजरने लिहिलं आहे की,' व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले'. व्हायरल व्हिडिओवर या कामगार महिलेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. व्हिडिओ पोस्ट होताच हजारोंच्या घरात पाहिला गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT