Viral Video saam digital
व्हायरल न्यूज

Viral Video: हॉटेलमध्ये सॅलड खाताय?, त्याआधी व्हायरल VIDEO नक्की पाहा

Shocking Viral Video: रेस्टॉरंटमध्ये महिलेने मागवलेल्या सॅलडमध्ये चक्क आळी आढळून आली आहे. हा संतापजनक प्रकार हरियाणाच्या गुरुग्राममधील एका रेस्टॉरंटमध्ये घडलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Food Viral Video

अलीकडे काही दिवसांपासून ट्रेनमधील जेवणात असो वा अनेक चांगल्या हॉटेलमधील जेवणात किडे आढळणाऱ्या गंभीर घटना घडत आहेत. एक दिवस संपत नाही तो पर्यंत असे संतापजनक प्रकार आपल्या कानावर पडत असतात अनेकवेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या संदर्भातील व्हिडिओ तसेच फोटो आपल्याला पाहायलाही मिळतात मात्र परत एकदा हीच पुनरावृत्ती घडली आहे.(VIRAL VIDEO)

एका रेस्टॉरंटमध्ये महिलेने मागवलेल्या सॅलडमध्ये चक्क आळी आढळून आली आहे. हा संतापजनक प्रकार हरियाणाच्या गुरुग्राममधील एका रेस्टॉरंटमध्ये घडलेला आहे. सदर महिलेने सर्व प्रकार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की महिलेने ऑर्डर दिलेली सॅलडची प्लेट व्हिडिओत दिसते. यात काही निवडक पदार्थ आहेत त्यात जर आपण पाहिले तर एक बारीक आळी रेंगाळत जाताना दिसत आहे. सॅलडमध्ये आळी दिसताच महिलेने तात्काळ संतापजनक प्रकार तिच्याजवळील मोबाईलमध्ये कैद केला आहे.

या महिलेने व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये हा प्रकार घडलेल्या रेस्टॉरंटचे नाव लिहून त्यांना टॅग केले आहे. गुरुग्राममधील संतापजनक प्रकार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावरील @dietholics21 या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच या संतापजनक व्हिडिओला 160 हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून अनेक स्तरातून नेटकरी वर्गाच्या प्रतिक्रिया येत आहे त्यातील एका यूजरने या व्हिडिओला पाहून लिहिले आहे की,'ट्विटरवर टाका, त्यांच्यावर कारवाई होईल' तर काहींनी लिहिले आहे की,असे प्रकार सध्या वाढत आहेत',तर काहींनी,' त्यांच्यावर कारवाई करण्याचा सल्ला दिलेला आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suna Yeti Ghara: घर, माणसं आणि नात्याचा खेळ पुन्हा रंगणार; 'सुना येती घरा' छोट्या पडद्यावर लवकरच सुरु होणार नवी मालिका

Driving License Rules: ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? आत्ताच करा हे काम, नाहीतर भरावा लागेल दंड; वाचा काय आहे नियम?

Jalgaon Crime: जळगाव हादरले! २८ महिन्यांत ५० चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार, आरोपी नातेवाईकच असल्याचे उघड

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

PM kisan Yojana : शेतकऱ्यांनो या २ चुका टाळाच, अन्यथा ₹२००० होतील बंद; पीएम किसान योजनेवर मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT