Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: चिमुकल्याला झोपवलं गाडीच्या डिक्कीत; आईने असं का केलं? VIDEO व्हायरल

Funny Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्या बाळाच्या आईचा जुगाड व्हायरल होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Littly Baby Viral Video

अनेकदा लहान मुलांना फिरायला जाताना प्रत्येक पालकांची दमछाक होते. प्रवासातील आधीच अनेक सामान सोबत असते. काही महिलांना बऱ्याचदा लहान मुल हातात असल्यामुळे जेवता येत नाही. जर लहान मुलाला एखाद्याने घेतले तर तेवढ्या वेळेत महिला जेवन करुन घेतात. सध्या बाजारात अनेक लहान मुलांसाठी अनेक गोष्टी मिळत असतात. जेणे करून बाळाला आपण पकडू शकतो आणि सह कोठेही वावरु शकतो. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्या बाळाच्या आईचा जुगाड व्हायरल होतोय. या व्हिडिओला पाहून नक्कीच तुम्ही डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरीलag_creation_004या अकाउंटवर जुगाड व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.या आधीही एका महिलेने लोकल ट्रेनमध्ये आपल्या चिमुकल्यासाठी असाच एक अनोखा जुगाड केला होता,ज्यात आईने लोकल ट्रेनमध्ये सामान ठेवल्या जाणाऱ्या ठिकाणी आपल्या चिमुकल्याला गर्दीतून वाट काढून बसवले होते. आईच आपल्या मुलांसाठी असं करु शकते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एका ठिकाणी आपल्याला एक लाल ,काळ्या रंगाची स्कूटर उभी आहे. स्कूटीच्या काही अंतरावर काही व्यक्ती बसलेले आहेत. त्या स्कूटीच्या डीक्कीमध्ये जर आपण नीट पाहिले तर आपल्याला एक बाळ झोपलेले दिसते. या बाळाची आई आपल्याला दुसरीकडे जेवायला बसलेली दिसत आहे. नीट जेवता यावे यासाठी या आईने चिमुकल्याला अनोखा जूगाड करुन गाडीच्या डीक्कीमध्ये व्यवस्थित झोपवले आहे.

व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'आई कुठे काय करते'. नेटकऱ्यामध्ये सध्या या व्हिडिओची तूफान चर्चा होत असून अनेत प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंटबॉक्समध्ये केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे कीस,' डीक्कीमध्ये चावी लावून डीक्की लावू नका म्हणजे झाल' तर इतर अनेक यूजर्संनी हसणाचे इमोजी कमेंटबॉक्समध्ये दिले आहेत. व्हिडिओला हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

Maharashtra Live News Update: दहिसर टोल नाका शिफ्ट करण्याचा सरकारचा निर्णय - प्रताप सरनाईक

Indurikar Maharaj Age: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज याचं वय किती? माहितीये का?

DNAचे जनक शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन; ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT