viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

viral Video: डोक्यावर सिलिंडर, पायाखाली काचेचा ग्लास अन् हातात तिरंगा; तरुणाचा खतरनाक डान्स पाहिलात का? VIDEO

Independence Day Dance Viral Video: स्वातंत्र्यदिनानिमित्त एका मुलाने शेअर केलेला व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.

Manasvi Choudhary

आज संपूर्ण देशभरात स्वांतत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळतो आहे. देशाप्रती प्रेम व्यक्त करताना प्रत्येकजण आनंदात दिसतोय. सोशल मीडियावर अनेकांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा व्हिडीओ पोस्ट केल्यात. अशातच स्वातंत्र्यदिनानिमित्त एका मुलाने शेअर केलेला व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.

देशात अशी काही माणसे आहेत जी त्यांच्या कलागुणांनी ओळखली जातात. माणूस हा आनंदाच्या भरात काय करेल याचा कोणीही अंदाज लावू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

व्हिडिओमध्ये एक मुलगा हातात तिंरगा घेऊन डान्स करतो आहे. मात्र या मुलाचा डान्स धडकी भरवणारा आहे. यामागचं कारण ही तसंच आहे. या मुलाने स्वातंत्र्यदिनानिमित्त हातात तिरंगा आणि डोक्यावर दोन गॅस उचलून डान्स केला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये हा मुलगा बिनधास्तपणे दोन गॅसचे सिलिंडर डोक्यावर उचलून हातात तिरंगा घेऊन डान्स करत आहे. इतकंच नाही तर काचेच्या ग्लासवर हा मुलगा हे सिलिंडर बॅलेन्स करताना दिसतोय.

@praveen_prajapat1 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर काही वेळातच या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. व्हिडीओवर अनेक कमेंट्स येत असून लाखो लाईक्स आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT