Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दुचाकीला कट का मारला? दोघांनी तरुणाला बेदम चोपलं,सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या उल्हानगरमधील घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात क्षुल्लक कारणावरुन तरुणाला मारहाण करत डोकं फोडल्याची घटना घडली.

Tanvi Pol

अजय दुधाणे,साम टीव्ही

Ulhasnagar Viral Video: गेल्या काही वर्षापासून उल्हासनगरमधून अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे.त्यातच सध्या पुन्हा एकदा उल्हासनगरमधून धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ज्यात उल्हानगरच्या घटनेत दुचाकीला कट मारल्याच्या वादातून तरुणाला मारहाण करत डोकं फोडल्याची घटना घडलीये.व्हायरल होत असलेली संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

नेमके घडले काय?

योगेश दिलवाले हा तरुण २० जानेवारी रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास उल्हासनगरच्या व्हीटीसी ग्राऊंड परिसरातून दुचाकीवर जात होता. यावेळी ओव्हरटेक करताना एका दुचाकीला कट लागल्यानं त्या दुचाकीवरील तरुणाने त्याला दुचाकी हळू चालव असं म्हणत थांबवलं आणि थेट मारहाण(Beating) करण्यास सुरुवात केली.

तर त्याच्या दुसऱ्या साथीदाराने योगेश याला फाईट मारल्यानं त्याचं डोकं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोवर आढळून त्याचं डोकं फुटलं. ही सगळी मारहाण तिथल्या सीसीटीव्हीत कैद झाली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेतायत.

उल्हासनगरमधील घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो व्हिडिओ इन्स्टाच्या 'saamtvnews'या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेली आहे.व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर उल्हासनगरच नाही तर संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.उल्हानगरमधील घडलेल्या अशा अनेक धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावरही व्हायरल झालेले आहे.

टीप : उल्हासनगरमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Vicky Kaushal : विकी कौशलने व्यक्त केली मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा, आवडता दिग्दर्शकही सांगितला

Henna Side Effects : केसांना मेहंदी लावताय? मग थांबा 'हे' नुकसान आधी जाणून घ्या

Original Paithani Saree: गुढीपाडव्याला नेसण्यासाठी ओरिजनल पैठणी साडी कशी ओळखायची?

SCROLL FOR NEXT