Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहताय, सावधान! तुम्हाला होऊ शकतो डायबिटीज?

Viral Message News: तुम्हाला रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर रील्स पाहण्याची सवय असेल तर आजच ही सवय बदलून टाका. नाहीतर तुम्हाला डायबिटीज होईल. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहण्याच्या सवयीवरून सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल होतोय.

Mayuresh Kadav

मोबाईल हा आपल्या जिवनाचा भाग बनलाय. मोबाईल नसेल तर जगणं मुश्किल होईल अशी प्रत्येकाचीच अवस्था आहे. अमेकांना तर उशिरा रात्रीपर्यंत मोबाईल पहिल्याशिवाय झोपच येत नाही. मात्र हीच सवय गंभीर आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहिल्यानं तुम्हाला डायबिडीज होऊ शकतो. ऑस्ट्रेलियन संशोधकांच्या अहवालाचा दाखला देत याबाबत मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये नेमकं काय म्हंटलंय ते जाणून घेऊ...

जे लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहतात त्यांना गंभीर आजार होऊ लागले आहेत. बऱ्याच लोकांना डायबिटीजच्या आजारानं ग्रासलंय. ऑस्ट्रेलियाच्या मोनाश युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 40 ते 69 वयोगटातल्या 85 हजार लोकांच्या अभ्यासातून हा अहवाल दिलाय. मोबाईलच्या ब्लू लाईटमुळे झोप उडते, त्यामुळे आरोग्य बिघडतं असही या मेसेजमध्ये म्हंटलंय.

आपण सगळेच जण सतत मोबाईल पाहत असतो. कुणाला तासन तास रील्स पाहायला आवडतात. तर कुणाला रात्रभर वेबसीरिज पाहण्याचं व्यसन जडलंय. त्यामुळे व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा कितपत खरा आहे याची आम्ही पडताळणी केली. आम्ही तज्ज्ञांना हा मेसेज दाखवला आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं ते जाणून घ्या....

व्हायरल सत्य

मोबाईल स्क्रिनची लाईट ही आर्टिफिशियल लाईट असते. ही लाईट डोळ्यावर पडल्यानं झोपेचं चक्र बिघडतं. आपल्या शरीरातील मेलाटोनिन हर्मोन्सला झोपेचा संप्रेरक असं म्हंटलं होतं. कारण हे हार्मोन शरीरात इन्सुलिन तयार करण्याचं काम करतं. शरीरातील साखरेचं प्रमाण संतुलित केलं जातं. मात्र झोपेचं चक्र बिघडल्यास त्याचा थेट परिणाम मेलाटोनिन हर्मोन्सवर होतो आणि पुढे टाईप 2 डायबिटीजचा धोका होऊ शकतो.

त्यामुळे आमच्या पडताळणीत रात्रभर मोबाईल पाहिल्यानं डायबिटीज होत असल्याचा दावा सत्य ठरलाय. तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर मोबाईलचा गरजेपुरताच वापर करा. रात्रभर मोबाईल पाहण्याची सवय तुम्हाला कायमचं झोपवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT