Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : किडनॅप करून तुम्हाला कारच्या डिक्कीत बंद केलं तर; या संकटातून बाहेर कसं पडायचं? पाहा VIDEO

How to Open Trunk Without Key : व्यक्ती थोड्या पैशांसाठी एकमेकांच्या जीवावर उठतात. अशात अपहरण करण्याच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Ruchika Jadhav

गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. व्यक्ती थोड्या पैशांसाठी एकमेकांच्या जीवावर उठतात. अशात अपहरण करण्याच्या घटना सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. मात्र पोलिसांना आपल्यापर्यंत पोहचण्यास उशिर झाला तर? त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट ट्रिक सांगत आहोत.

लहान मुलं किंवा मग तरुण मुलींचे अपहरण वाढले आहे. गुन्हेगार आपल्याला किडनॅप करतात आणि कार किंवा कोणत्याही गाडीच्या डिक्कीमध्ये बंद करून ठेवतात. अशावेळी बाहेरून डिक्की लॉक असल्याने आपल्याला बाहेर कसं पडावं हे समजत नाही. मात्र यातून बाहेर कसं पडायचं याची एक छोटी आणि सिंपल पण तितकीच फायदेशीर ट्रिक एका तरुणाने शोधली आहे.

@indiandriveguide या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, या तरुणाला कारच्या डिक्कीत बंद केलं आहे. येथे बंद केल्यावर आतमध्ये तुम्हाला जीव गुदमरत असल्यासारखे वाटेल. अशावेळी सर्वात आधी काय करायचे ते या तरुणाने सांगितले आहे.

सर्वात आधी कारमध्ये ड्रायव्हर सीट असते त्या बाजूला पाहा. पुढे तुम्हाला एक वायर दिसेल. ही वायर तुम्ही खेचून तोडू शकता. किंवा मग याच्या शेजारी तुम्हाला एक बटण दिसेल. हे बटण तुम्हाला खालच्या दिशेने खेचावे लागेल. अशा पद्धतीने तुम्ही ज्या कारच्या डिक्कीमध्ये आहात ती अनलॉक होईल. तसेच तुमची सुटका होईल.

आता कारची डिक्की उघडली आहे हे चालकाला समजण्याआधी तुम्हाला येथून पळ काढावा लागेल. त्यासाठी डिक्की उघडताच तुम्ही जर रस्त्यावर असाल तर तेथे आरडा ओरडा करण्यास सुरुवात करा. यामुळे इतर व्यक्तींना तुमची अडचण समजेल आणि अपहरण करणाऱ्या व्यक्तीला देखील पोलीस अटक करतील.

तरुणांनी ही महत्वाची माहिती शेअर केल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सर्वत्र या व्हिडिओची चर्चा सुरू आहे. व्यक्ती या तरुणांचे कौतुक करत आहेत. काहींनी या तरुणांचे आभार सुद्धा व्यक्त केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT