bike rider swept away by water Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video : मुसळधार पावसानं आला रस्त्याला पूर; तरूण दुचाकीसह गेला वाहून, थरारक VIDEO

Hyderabad rain bike rider swept away by water : रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहात तरूण दुचाकीसोबत वाहून गेल्याची घटना समोर आलीय. ही घटना हैदराबादमधील असल्याचं सांगितलं जातंय.

Rohini Gudaghe

मुंबई : हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. तेथील एक व्हिडिओ समोर आलाय. युसूफगुडा येथील कृष्णा नगरमध्ये एका दुचाकीसह एक तरूण रस्त्यावर पाण्याच्या जोरदार प्रवाहात तरंगताना दिसल आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं. त्यामुळे दुचाकीस्वाराचं थोडं नियंत्रण सुटलं अन् तो दुचाकीसोबत पाण्यात वाहून जायला लागला.

मुसळधार पावसानं आला रस्त्यावर पूर

हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत (Viral news) आहेत. येथे, युसूफगुडा येथील कृष्णा नगरमध्ये एका दुचाकीसह एक व्यक्ती रस्त्यावरील पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसत आहे. यावेळी इतर दोन जणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, ते दोघेही काही अंतरावर वाहून जाताना दिसले. परंतु सर्वजण घटनेतून बचावले असल्याचं सांगितलं जातंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हैदराबादमध्ये मुसळधार पावसानंतर २० ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सुर्या रेड्डी नावाच्या X अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात (viral video) आलाय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, हैदराबादमधील युसुफगुडा येथील कृष्णा नगर येथील रस्त्यावरील पुरात एक व्यक्ती दुचाकीसह वाहून गेल्याचं दिसलं. दोन लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असताना ते देखील काही अंतरापर्यंत वाहून गेले होते. नंतर या व्यक्तीला वाचवण्यात यश मिळालं.

हैदराबादमधील घटना

हैदराबादमध्ये पहाटेच मुसळधार पाऊस (Hyderabad News) पडला. हॅश टॅश हैदराबाद पाऊस, असं म्हणत हा व्हिडिओ शेअर केला गेलाय. व्हिडिओमध्ये दिसतंय की, तरूण एकदम बिनधास्तपणे दुचाकी चालवत आहे. अचानक पाण्याचा प्रवाह खूप वाढतो, अन् त्याचा धक्का दुचाकीस्वाराला (Rain Video) बसतो. त्यामुळे दुचाकीसोबत तरूण वाहून जाताना दिसतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT