CCTV Footage Saam Tv
व्हायरल न्यूज

Accident Shocking CCTV Footage: हैदराबादमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार २० फूट अंतरावर उडून पडला; VIDEO व्हायरल

Accident Video: हैदराबादमध्ये एक कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास जुबली हिल्ल येथे ही घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hyderabad Accident Viral Video:

हैदराबादमध्ये एक कार आणि बाईकचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास जुबली हिल्ल येथे ही घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

माधापूर येथील नोव्होटेल हॉटेलमध्ये बाऊन्सर म्हणून काम करणाऱ्या तारक राम यांच्या बाईकचा अपघात झाला आहे. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तो त्याचा मित्र राजूसोबत बाईकवरुन जात होता. तेव्हा मागून अचानक एक कार भरधाव वेगात येते आणि बाईकला धडक देते. ही धडक इतरी जोरदार होती की या अपघातात तारक रामचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Latest News)

या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. यात पहाटे पाच वाजता रस्त्यावरुन भरधाव वेगाने वाहने जात आहे. रस्त्यावर लोकांची जास्त वर्दळ नसल्याने वाहने खूप जास्त वेगाने जाताना दिसत आहे. यात रस्त्यावरुन एका बाईकवरुन दोघेजण जात होते. त्यावेळी मागून भरधाव वेगात कार येते आणि बाईकला धडक देते. या धडकेत तारक राम २० फूटापर्यंत लांब फेकला गेला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात तारक रामच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याचे २ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला ११ महिन्यांचे बाळ आहे. जुब्ली हिल्स पोलिसांना कारचालकावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही च्या माध्यमातून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. कारचालकाला अटक करण्यात यश आले नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT