Saam Tv
व्हायरल न्यूज

पती स्नॅक्स आणायला विसरला आणि पत्नीने केला चाकूहल्ला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

Husband Wife Viral Video: पती आवडते स्नॅक्स आणायला विसरला, यामुळे संतापलेल्या पत्नीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. मोबाईल कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. पाहा नेटकऱ्यांना हादरवणारा व्हिडिओ.

Tanvi Pol

Couple Fight: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओत एका पत्नीनं केवळ स्नॅक्सच्या कारणावरून तिच्या पतीवर चाकू हल्ला केला. सुरुवातीला ही गोष्ट कुणालाही खोटी वाटू शकते, पण जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा अनेकांनी डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं.

काय आहे प्रकरण?

ही घटना नेमकी कुठली आहे ते अद्याप समजले नाही. मात्र या जोडप्याचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. ज्यामध्ये दोघंही भांडणाताना दिसत आहेत. पती कामावरून घरी परततो आणि त्याच्या हातात पत्नीने मागवलेले आवडते खाद्य पदार्थ नव्हते. एवढ्या छोट्याशा कारणावरून पत्नीचा पारा चढतो. ती त्याच्यावर आरडाओरडा करू लागते

या वादाचे रूपांतर हाणामारीत होतं आणि एका क्षणी ती स्वयंपाकघरातून चाकू घेऊन थेट पतीवर धावते. चाकूने ती त्याच्या खांद्यावर वार करते. सुदैवाने जखम गंभीर नाही आणि शेजाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत प्रसंग आटोक्यात आणला.

घटना सोशल मीडियावर व्हायरल

या प्रकरणाचा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर समोर येताच तो काही तासांतच व्हायरल झाला. अनेक नेटिझन्सनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केलं. काहींनी पत्नीच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला, तर काहींनी अशा हिंसक नात्यांबाबत चिंता व्यक्त केली. काहींनी विनोदी पद्धतीनेही प्रतिक्रिया दिल्या, "इतकं काय ते पदार्थ महत्त्वाचं होतं?" अशा कमेंट्स केल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Fitness Routine: खरचं १०,००० पाऊलं चालण्याने शरीरात हे चमत्कारीक बदल होतात का?

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

SCROLL FOR NEXT