Wedding Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video:एक लग्न असेही! नवरा नवरीने बांधली रूग्णालयात लग्नगाठ;VIDEO एकदा पहाच

Wedding Viral Video: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीस असा क्षण असतो. आपले लग्न थाटामाटात करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.अशातच सोशल मीडियावर एका अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वधू-वराने एका रूग्णालयात चक्क सप्तपदी घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Wedding In Hospital

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीस असा क्षण असतो. आपले लग्न थाटामाटात करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अलीकडेच अनेकजण डिस्टीनेशन वेडींग करण पसंत करतात. अशातच सोशल मीडियावर एका अनोख्या लग्नाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वधू-वराने एका रूग्णालयात चक्क सप्तपदी घेतली आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एक विवाह असाही...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, हा व्हिडिओ एका रूग्णालयातील आहे. रूग्णालयातील एका खोलीला लाल रंगाचे फुगे आणि कापड लावून सजवण्यात आले आहेत. यामध्ये आपल्याला वधू-वरासह काही घरची मंडळी दिसत आहे. हे दोघे नवरा-नवरीच्या पोशाखात छान नटलेले आहेत. व्हिडिओच्या शेवटी नवरी नवऱ्याच्या गळ्यात हार घालताना दिसते आणि नंतर नवरदेवही नवरीच्या गळ्यात हार घालतो.

व्हायरल व्हिडिओ हा @CHUTIYAPAया इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या विवाह सोहळ्याचा व्हिडिओ हा गाझियाबाद येथील रूग्णालयातील आहे. व्हायरल व्हिडिओच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये या जोडप्याने रूग्णालयात लग्न का केल याच कारण सांगितल आहे. या पोस्टच्या कॅप्शननूसार, लग्नापूर्वी नवऱ्या मुलाला डेंग्यू झाला होता. त्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र लग्नाची तारीख आधीच ठरली असल्याने हे लग्न माडंवात होण्याऐवजी रूग्णालयात पार पडल.ज्याला दोन्ही बाजुकडील मंडळीनी हजेरी लावत वधू-वरास आशिर्वाद दिले.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात नेटकरी लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. यासोबतच नेटकरी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं आहे की,'खर्च वाचला भाऊ, तो स्वस्तात सेटल झाला ' तर आणखी एका यूजरने लिहिलं की ,'तो सरकारी कर्मचारी होता का?,' अशा प्रकारे या व्हिडिओवर काहीच्या गंमतशीर तर काहींनी नवर देवास काळजी घेत लवकर बरा होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT