Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ताटात रोटीच पाहिजे, कोल्हापुरात राडा, ११ जणांनी हॉटेल मालकाला धू धू धुतला, व्हिडीओ व्हायरल

Fighting Video: सोशल मीडियावर सध्या एका जोरदार झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात काहीजणांनी थेट हॉटेल चालकाला मारहाण केली आहे. घडलेल्या घटनेचे कारण काय ते एकदा पहा.

Tanvi Pol

kolhapur Video: गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रातील प्रत्येक शहारातून अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच सध्या कोल्हापुरमधून अशीच एका घडलेल्या हाणामाराची घटना समोर आली आहे, ज्या घटनेत हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण करण्यात आलेली असून हॉटेलचेही नुकसाना झालेले आहे. सध्या घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

नेमके घडले काय?

व्हायरल (Viral)होत असलेली संपूर्ण घटना कोल्हापुरातल्या शाहूपुरीतील रेल्वे स्टेशन रोडवरील आहे. ज्या परिसरात असलेल्या हॉटेल व्यवसायिकाला जबर मारहाण करण्यात आली आहे. जेवणाच्या ताटाला रोटीच पाहिजे या कारणावरून झालेल्या वादामध्ये ११ जणांनी हॉटेलच्या मालकाला मारहाण करत हॉटेलची तोडफोड ही केली. घडलेल्या हामारीत हॉटेल मालक तिघेजण जखमी झालेत.

कोल्हापुरमधील घडलेल्या घटनेनंतर या प्रकरणी ११ जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या गुन्ह्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश देखील आहे. दरम्यान मारहाणीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान आरोपींचा शोध शाहूपुरी पोलीस घेत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलेला आहे, मात्र तो प्रत्येकाला ''saamtvnews''या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर यापूर्वीही अशा अनेक घटनांचे व्हिडिओ युट्युबवर व्हायरल झालेले आहे.

टीप : कोल्हापुरमधील घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,मात्र याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saree Draping Style: लग्नसराईत सहावारी साडीला द्या हटके लूक; पाहा या साडी नेसण्याच्या ७ स्टायलिश पद्धती

बदलापुरात राजकीय वाद टोकाला; शिंदे गटाच्या नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण

Homemade BB Cream: 5 मिनिटांत घरच्याघरी बनवा नॅचरल बीबी क्रिम, काचेसारखा चमकेल चेहरा, पैशांचीही होईल बचत

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळा ८०० रूपयांनी स्वस्त, वाचा जळगाव-पुण्यातील ताजे दर

Pune : तू रोगीट..." पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, नवऱ्याच्या आणि सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT