Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बैलाची विमान उडी कधी पाहिली का? बैलगाडा शर्यतीतला व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Bullock Cart Race: सोशल मीडियावर सध्या एका बैलगाडा शर्यतीमधील व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मोठ्या पसंतील आलेला आहे, असे नक्की काय घडले असेल ते पाहा.

Tanvi Pol

विनोद पाटील, साम टीव्ही

Bull jump Video: बैलगाडा शर्यतीत वेगानं धावणारा बैल आपल्यापैंकी प्रत्येकाने बऱ्याचदा पाहिला असेल. मात्र, बैलाची अशी विमान उडी पाहिलीय का? नाही ना... चला, आज आपण पाहूया एक भन्नाट व्हिडीओ, जिथं बैलाने अक्षरशः एखाद्या हरणासारखी उडी घेतलीय. तीही अशी की डोळे विस्फारले जातील आणि तोंड आपोआप उघडलं जाईल.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला बैलगाडा शर्यत दिसत आहे. शर्यत पाहण्यासाठी लांबून अनेक लोक मोठ्या संख्येने जमलेले आहेत. उन्हाचा पर्वा न करता लहानांपासून ते मोठ्यापर्यंत लोकं दिसत आहेत. त्यातच शर्यत सुरु झाली असता त्यातील एक बैल अतिशय वेगाने पळत येतो आणि लोकांच्या डोक्यावरुन अतिशय लांब लचक उडी मारतो. बैलाची उडी पाहून काहीजण हैराण झालेले आहेत तर काहींजण पाहतच राहिले आहेत.

हा व्हिडिओ सध्या महाराष्ट्र नाही तर प्रत्येक राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आवडलेला आहे. त्यातील हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड होताच लोकांनी हजारो लाईक्स आणि मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळवून दिलेले आहेत.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

बैलगाडा शर्यतीतला व्हिडिओ(Video) पाहून लोकांनी अनेक प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''यालाच म्हणतात साक्षात महादेवाच्या नंदीचा अवतार'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''कोणाला ही धक्का ना लावता अशी उडी मारणं म्हणजे जॉक नाही'' त्यातील अजून एका यूजरने कमेंट केली,''गुणी बैल आहे . त्याला किती जाणीव आहे की मी उडी मारली तर लागणार नाही . त्याला बैल नाही देव बोलले पाहिजे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: बैलगाडा शर्यतीमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात HFSS अन्नपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध; अन्न व औषध प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT