Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

मित्राने शूट केला मित्राच्या मृत्यूचा व्हिडिओ; आंघोळीचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला

Tragic death caught on camera: सोशल मीडियावर एका तरुणाच्या मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेला आहे. नक्की काय घडले आहे ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Uttarakhand Viral Video: अनेकदा सांगूनही काही लोक पाण्याशी असलेल्या धोक्याला गांभीर्याने घेत नाहीत आणि त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा सर्वांना पाहायला मिळाले. उत्तर भारतातील एका प्रसिद्ध घाटावर गंगेत आंघोळ करण्यासाठी गेलेल्या काही तरुणांमध्ये एकाने आपला जीव गमावला. धक्कादायक बाब म्हणजे, तरुणाचा मित्र त्याच्या मृत्यूचा थरारक व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत होता.

ही घटना सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल(Viral) झाली असून, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, तरुण मित्रांसह फिरायला गेला आहे. दरम्यान त्याला पाण्यात आंघोळीसाठी जाण्याची इच्छा होते. त्यानंतर तो पाण्यात आंघोळीसाठी उतरतो पण पाण्याचा अंदाज न खाल्यानेत तो खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला.

या घटनेनंतर सोशल मिडियावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ''सध्या प्रत्येकजण सोशल मीडियाच्या नादात पागल झालेला आहे'' असे एका यूजरने म्हटलं आहे तर दुसऱ्या यूजरने म्हटलं की,''माणसाच्या जीवापेक्षा सोशल मीडियावरील व्हिडिओ महत्त्वाचे आहे'' असा संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहे.

हा व्हिडिओ(Video) हरिव्दारमधील असल्याचे समोर आले आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्राम, एक्स, फेसबूक अशा अनेक प्रसिद्ध माध्यमांवर अपलोड करण्यात आलेला आहे. सोशल माध्यमांवर याआधीही असे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत,ज्यात सध्याच्या तरुणानी सोशल मीडियावर धोकादायक स्टंट करतात.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss House: बिग बॉस मराठी६ सुरू होण्याआधी घराची पहिली झलक आली समोर; रहस्यांनी भरलेल्या घरात काय आहे नवीन?

Mahayuti Manifesto: लाडकींना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, बेस्ट प्रवासात ५० टक्के सूट; मुंबईकरांसाठी महायुतीकडून घोषणांचा पाऊस

Viral Video: 9 वर्षांनंतर अचानक समोर आला बॉयफ्रेंड आणि....! लॉन्ग डिस्टन्स कपलचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Tilgul Ladoo: तिळगुळ लाडू मऊ होण्यासाठी वापरा 'या' ३ सोप्या ट्रिक्स; ही आहे सोपी रेसिपी

Pune : प्रशांत जगतापांचे गुंड टिपू पठाणशी "घनिष्ट" संबंध? जामिनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आरोप

SCROLL FOR NEXT