Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी; कपडे फाटेपर्यंत एकमेंकाना मारहाण; सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात काही विद्यार्थ्याच्या टोळक्याकडून काही जणांना मारहाण करण्यात आलेली आहे.व्हायरल व्हिडिओ तुम्हीही पहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fighting Video: सोशल मीडियावर अनेकदा विद्यार्थ्यांच्या हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.कितेकदा काही विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे.त्यातच सध्या अशात एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात विद्यार्थ्याच्या टोळक्याकडून तिघांना दगडासह लाठी काठीने कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,व्हायरल (Viral)व्हिडिओ लोणी काळभोर येथील असल्याचे समजते. जिथे एमआयटी कॉर्नर परिसरात विद्यार्थ्याच्या टोळक्याकडून तिघांना दगडासह लाठी काठीने कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. वारंवार होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

लोणी काळभोर जवळ शैक्षणिक संकुल आहे. या संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. काही विद्यार्थी संकुलाच्या वस्तीगृहात राहतात. तर काही विद्यार्थी एमआयटीने संकुलाच्या बाहेरच्या परिसरात भाडेतत्वावरील घेतलेल्या वस्तीगृहात राहतात. तर काही विद्यार्थी स्वत: फ्लॅट घेऊन मित्रांसोबत भाडेतत्वावर राहतात.

हाणामारीचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे,मात्र तो इन्स्टाच्या 'saamtvnews' या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर असंख्य लाईक्स आणि असंख्य व्ह्यूज नेटकऱ्यांचे मिळालेले आहेत.

टीप : घडलेल्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT