लग्न म्हटल्यावर सर्वांचे मानपान आलेच. अनेक घरांमध्ये लग्नात आत्या, मामा किंवा घरातील अन्य मोठे जावई रुसल्याचं ऐकायला मिळतं. मानपान न मिळाल्याने व्यक्ती लग्नात भांडणं देखील करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये लग्नाला आलेले पाहुणे लग्नातील जेवणावरून भांडत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लग्नातील गोड पंचपक्वान असलेलं जेवण सगळ्यांनाच आवडतं. त्यासाठी घरात एक लग्नपत्रिका आली तरी अनेक जण आपल्या ओळखीच्या बऱ्याच व्यक्तींना लग्नाला घेऊन जातात आणि जेवणावर ताव मारतात. लग्नात पनीरची भाजी आता कॉमन झाली आहे. सर्वच लग्नांमध्ये जेवणात पनीरची भाजी असते. अशात व्हायरल व्हिडीओमध्ये लग्नाला आलेले पाहुणे पनीरच्या भाजीसाठी भांडत आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नासाठी जेवणाच्या मंडपात नवरा आणि नवरी दोन्हीकडील माणसं जमली आहेत. जेवताना आमच्या भाजीत पनीर नाही म्हणून या पाहुण्यांमध्ये आधी बाचाबाची होते. काही वेळातच त्यांच्यातल्या या भांडणांना हाणामारीचं स्वरुप मिळतं. वधू आणि वर दोन्ही बाजूच्या व्यक्ती एकमेकांना मारहाण करू लागतात.
या मारहाणीत कोण हॉलमधील खुर्च्या तोडत आहे तर कोण पडदे फाडत आहे. हाणामारीत मंडपाची पूर्णता वाट लागलीये. झालेल्या घटनेमुळे नवरा नवरी दोघेही घाबरलेत. तर मंडपात खुर्च्यांसह दोन्ही बाजूच्या माणसांनी एकमेकांना धक्काबुक्की आणि मारहाण केलीये. खतरनाक राड्याचा हा व्हिडीओ @Ghar ke kalesh या ट्वीटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय.
व्हिडीओ पोस्ट केल्यापासून आतापर्यंत यावर लाखोंच्या घरात लाइक्स आलेत. एकाने यावर कमेंट करत लिहिलंय, नो पनीर नो शादी. तर आणखी एकाने पनीर का चक्कर बाबू भय्या असं लिहिलंय. खुर्च्या तोडून पनीरचे पैसे वसूल करत आहेत, असंही एका नेटकऱ्याने लिहिलंय. लग्नातल्या अनेक मजेशीर गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र या व्हिडीओला कसलीच तोड नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.