Delhi Metro Viral Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Video: दिल्ली मेट्रोत चाललयं काय? प्रवाशांच्या गर्दीत तरुणींची रंगपंचमी अन् अश्लिल डान्स; संतापजनक VIDEO

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांचे एकापेक्षा एक अतरंगी प्रताप पाहायला मिळतात. असाच एक संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Holi Celibration In Delhi Metro Viral Video:

होळीचा (Holi Festival 2024) सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्याआधीच सोशल मीडियावर रंगपंचमीचे व्हिडिओ अन् असंख्य रिल्स पाहायला मिळत आहेत. अनेक रिलस्टार होळीच्या सणाचा उत्साह दाखवण्यासाठी वेगवेगळे हटके कंटेट तयार करत आहेत. अशातच दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दिल्ली मेट्रो (Delhi Metro) अन् व्हायरल व्हिडिओ हे प्रकरण काही नवीन नाही. दिल्ली मेट्रोमधील प्रवाशांचे मेट्रोमधील चित्रविचित्र प्रताप काही थांबायचे नाव घेत नाहीत. दिल्ली मेट्रोमध्ये प्रवाशांचे एकापेक्षा एक अतरंगी प्रताप पाहायला मिळतात. असाच एक संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुणी चक्क मेट्रोमध्ये रंगपंचमी खेळताना दिसत आहेत. इतकेच नव्हेतर प्रवाशांच्या गर्दीत अश्लिल डान्सही करताना दिसत आहेत. तरुणींच्या या कृतीवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून दोघींवरही कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Latest Marathi News)

व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की मेट्रोमध्ये बसून दोन तरुणी एकमेकांना रंग लावत असल्याचे दिसत आहे. रंग लावून झाल्यानंतर दोघीही एकमेकांना मिठी मारत अंग लगा दे रे गाण्यावर अश्लिल डान्सही करत आहेत.

प्रवाशांच्या गर्दीत तरुणींनी केलेला हा प्रताप पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या दोन्ही तरुणींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ बनवताना भान ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT