Back Flip Stunt Video SaaM tv
व्हायरल न्यूज

Back Flip Stunt Video: महिला जोमात पब्लिक कोमात; भररस्त्यात साडी नेसून स्कुटीवर भन्नाट स्टंट, पाहा VIDEO

Girl Doing Back Flip Stunt Video: सोशल मीडियावर एका तरुणीचा भन्नाट स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले पहायला मिळतात. महिलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ आजवर तुम्ही पाहिले असतील. गेल्या काही दिवसांपासून ट्रेन, कॉलेज अशा ठिकाणी महिला आणि तरुण मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अशात आता सोशल मीडियावर एका तरुणीचा भन्नाट स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Latest Viral Video)

अनेक मुलींना साडी संभाळता येत नसल्याने त्याबाबत त्या तक्रार करतात. त्यांना साडी नेसता येत नाही अथवा साडीमध्ये निट चालता येत नाही, पडण्याची भीती अशी कारणे सांगतात. मात्र या सर्वच मुलींची एका तरुणीने बोलती बंद केली आहे. या तरुणीने थेट स्कूटीवर भन्नाट स्टंट केला आहे. तिच्या स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी साडी नेसून रोडवर येते. इथे ती आपली स्कूटी रस्त्याच्या कडेला उभी करते. त्यानंतर साडी नेसून तरुणी स्कूटीच्या सीटवर शेवटच्या बाजूने उभी राहते आणि मोठी कोलांटी उडी घेते. तिचा हा स्टंट पाहून रस्त्यावर असलेल्या सर्वच व्यक्ती चकीत होतात. महिलेच्या या व्हिडिओवर नेटकरी आता भन्नाट कमेंट करत आहेत.

डोळ्यावर पट्टी बांधून स्टंट

कोणताही स्टंट करताना आपले डोळे उघडे असणे गरजेचे आहे. मात्र या स्टंटवेळी तरुणीने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते. डोळ्यांवर पट्टी बांधून देखील तरुणी परफेक्ट टायमींगमध्ये स्टंट करते. यावेळी ती उलट उडी मरताना हवेत लांबवर झेप घेते. हवेत संपूर्ण शरीर उचलून गोल उडी मारतानाचा महिलेचा व्हिडिओ भन्नाट व्हायरल होतोय. (@shalugymnast) या इन्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. काही मिनीटांतच व्हिडिओवर ५ लाखांच्या घरात व्ह्यूव्ज आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT