Girl Squeeze Lemon In Eye Saam TV
व्हायरल न्यूज

Girl Squeeze Lemon In Eye: पोरीचा अतिशहाणपणा! रील्सच्या नादात डोळ्यात लिंबू पिळला; धक्कादायक शेवट नक्की पाहा

Girl Squeeze Lemon In Eye Video Viral: बेभान होऊन हे तरुण अतरंगी कारणामे करतात. मात्र अनेकदांचा त्यांचा शहाणपणा त्यांच्याच अंगाशी येतो.

Ruchika Jadhav

Viral Video:

सोशल मीडियावर फेमस व्हावं, आपल्यावर लाईक्सचा वर्षाव व्हावा यासाठी सर्वच जण इन्स्टाग्रामवर रील्स व्हिडीओ शेअर करतात. रील्स व्हिडीओ पोस्ट करताना आपण काय करतोय आणि काय नाही याचं काही तरुणांना भान नसतं. बेभान होऊन हे तरुण अतरंगी कारणामे करतात. मात्र अनेकदा त्यांचा शहाणपणा त्यांच्याच अंगाशी येतो. (Latest Marathi News)

सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लिंब जेवणात पदार्थांची चव वाढवतो. त्यामुळे अनेक जण लिंबू खतात. लिंबू पाणी पितात. यासह पितळेची भांडी स्वच्छ करण्यासाठी देखील लिंबू वापरलं जातं. लिंबूचे विविध फायदे आणि उपयोग आहेत. मात्र तुम्ही कधी डोळ्यांत लिंबाचा रस पिळला आहे का?

एका मुलीने स्वत:च्या डोळ्यांत लिंबाचा रस पिळण्याचा भलताच शहाणपणा केला आहे. मात्र हा स्टंट करताना तिची चांगलीच फजीती झाली आहे. डोळ्यात लिंब पिळलं खरं मात्र नंतर तिच्या डोळ्यांची जोरदार आग होऊ लागली. डोळे झोंबत असल्याने तिने जवळ असलेल्या रुमालाने डोळा पुसला. मात्र लिंबाचा रस डोळ्यात भिनला होता.

मुलगी मोठमोठ्याने ओरडत होती किंकाळत होती. मात्र घरी कदाचीत कुणीच नव्हते. त्यामुळे तिच्या मदतीसाठी कुणालाही तातडीने येता आलं नाही. ही संपूर्ण घटना तिने रील बनवण्यासाठी सुरू केलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तिला आपला डोळा गमवावा लागला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. एकाने यावर म्हटलं आहे की, प्रसिद्धीसाठी जीव धोक्यात घातला. लिंबात अॅसिड असतं. मात्र तरीही मुलीने असं केल्याने काहींनी तिची काळजीही व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे स्टेशन स्थानकात रेल्वे प्रवाशांची तुफान गर्दी

Crime : बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्टच कापला

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

SCROLL FOR NEXT