Shocking Reels Video Saam Tv
व्हायरल न्यूज

पॉप्युलर होण्यासाठी मर्यादा ओलांडल्या! डान्स करताना ओढणी पेटवली; महिलेचा व्हिडिओ आला समोर

girl dancing with fire on dupatta: सोशल मीडियावर वारंवार विविध रिल्स पाहण्यासाठी मिळत असतात. हेच रिल्स व्हिडिओ तयार करण्यासाठी काहीजण सर्व मर्यादा ओलाडंतात. सध्या असाच एका धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.

Tanvi Pol

Dangerous dance performance: आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काहीजण अजब-गजब स्टंट करताना दिसतात. बरेचजण तर अनोख्या फॅशनमध्ये फोटोशूट करतो, तर काही धोका पत्करूनही व्हिडिओ तयार करतो. मात्र, काहीजण अशा टोकाच्या गोष्टी करतात ज्या त्यांच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण करतात. सध्या असाच एक भयंकर प्रकार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

प्रसिद्धीच्या नशेत धक्कादायक कृत्य

एका महिलेने रील्सवर(Reels) प्रसिद्ध होण्यासाठी चक्क तिच्या ओढणीला आग लावली आणि नंतर त्या पेटलेल्या ओढणीसह डान्स करायला सुरुवात केली. हे सर्व तिने चित्रीत करून इन्स्टाग्रामवर टाकलं आणि काही क्षणांतच तो व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

व्हिडिओमध्ये काय?

या व्हायरल व्हिडिओत संबंधित तरुणी पारंपरिक वेशात दिसत आहे. तिने रंगीबेरंगी ओढणी घेतली असून ती डान्स करताना दिसते. सुरुवातीला सर्व काही सामान्य डान्स करते असं वाटतं, पण काही क्षणांनी तिच्या ओढणीला चक्क आग लागते. विशेष म्हणजे ही आग तिने स्वतःच लावल्याचं स्पष्ट होतं. आगीची जाणीव असूनही ती थांबत नाही, उलट त्या पेटलेल्या ओढणीसह ती जोरदार डान्स करत राहते. हा सर्व प्रकार काही क्षणांसाठीच असतो, पण तो प्रेक्षकांना धक्का देणारा आणि धोकादायक वाटतो.

सोशल मीडियावर संतापाची लाट

हा व्हिडिओ व्हायरल (Viral) होताच लोकांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली. ''हे फक्त प्रसिद्ध होण्यासाठी केलेलं वेडं कृत्य आहे'' असं म्हणत अनेकांनी या महिलेच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. काहीजणांनी म्हटलं,''लोक इतकेही मूर्ख कसे असू शकतात की त्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून फॉलोअर्स मिळवायचे आहेत'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blue Jeans Ban: 'या' देशात निळी जीन्स घातल्यास होतो तुरुंगवास?

आधी वहिनीचं डोकं दगडानं ठेचलं; नंतर भावाचा जेथे मृतदेह सापडला होता तेथेच घेतला गळफास, दुहेरी हत्याकांडाचं गूढ काय?

अजित पवार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ब्लॅक बॉक्सचा डेटा पूर्ण डाउनलोड, पुण्यतिथीआधी सत्य बाहेर येणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

Monsoon Tips: पावसाळ्यात घरातील कुबट वास होईल गायब, फक्त पाण्यात उकळा 'या' ५ वस्तू करते

Monsoon Rain : पावसात भिजल्यावर लगेच गरम पाण्याने आंघोळ करावी का?

SCROLL FOR NEXT