Funny Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Funny Viral Video: ‘हॅलो गाईज खाना खा लो... चिमुकलीने घरात Vlog सुरू केला; मध्येच आई आली अन् बिचारीची केली अशी धुलाई... VIDEO

Mother Slap A Girl In Live Vlog Viral Video: एका छोट्या मीडिया इंफ्लुएंसरच्या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे; ज्यामध्ये ती जेवण करताना लाईव्ह व्लॉग करत असल्याचे दिसत आहे...

Gangappa Pujari

Viral Video News: सध्या सोशल मीडियावर लहान मुले- मुलीही सर्रास रिल्स, लाईव्ह व्लॉग्ज बनवताना दिसतात. अनेक लहान मुले- मुले सोशल मीडियावरुन मोठी कमाईही करत आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करत असताना अनेकदा या चिमुरड्यांसोबत असे काही मजेशीर प्रकार घडतात जे तुफान व्हायरल होतात.

सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये एक मुलगी आपल्या मोबाईलवर लाईव्ह व्लॉग करताना दिसत आहे. मात्र याचवेळी तिची आई मध्ये येते अन् बिचारीला बदडून काढते. हा मजेशीर प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. (Viral Video News In Marathi)

तरुणांसह लहान मुलांनाही सध्या रिल्सचे (Reels) वेड लागले आहे. सतत सोशल मीडियावर रिल्स बनवून व्हिडिओ टाकण्याचा जणून छंदच सध्या तरुणाईला जडला आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक खासगी क्षण ते सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत असतात. सध्या अशाच एका छोट्या मीडिया  इंफ्लुएंसरच्या व्हिडिओने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

ज्यामध्ये ति जेवण करताना लाईव्ह व्लॉग करत असल्याचे दिसत आहे. पण मधेच या मुलीची आई व्हिडिओमध्ये येते अन् हा प्रकार पाहून चांगलीच संतापते. याच रागाच्या भरात आईने असं काही केलं की व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसू येईल.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) एका हातात ताट आणि एका हातात मोबाईल घेवून ही चिमुकली व्हिडिओ बनवत आहे. ज्यामध्ये ती हॅलो गाईज खाणा खा लो.. असे म्हणत जेवणाचे अपडेट देत आहे. इतक्यात तिची आई समोर येते आणि हा सगळा प्रकार पाहून मुलीच्या कानाखाली मारते. यावेळी आई तिला तु जेवलीस का आधी म्हणत चिमुकलीला चांगलेच खडेबोल सुणावते.

हा संपूर्ण प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. आत्तापर्यंत तब्बल ९ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. ज्यावर प्रतिक्रिया देताना अनेकांनी असं करतात का? म्हणत मुलीची बाजू मांडली आहे. तर काही जणांनी मुलांना लागलेल्या व्यसनाबद्दल काळजी व्यक्त केली आहे... (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: लग्नाआधी जोडीदार निवडताना या 7 गोष्टी नक्की तपासा; नाहीतर नंतर पश्चात्ताप होऊ शकतो

Kitchen Safety Tips: गॅस- स्टोव्हच्या जवळ 6 वस्तू ठेवणे टाळा, वास्तुशास्तानुसार ठरू शकते घातक

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

SCROLL FOR NEXT