GAON KI BETI YOJANA FACT CHECK saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: लाडकींना केंद्राकडून महिन्याला 5 हजार? केंद्र सरकारची गाव की बेटी योजना?

Gaon Ki Beti Yojana 5000 Monthly Women Fact Check: आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता गावातील महिलांना दरमहा 5 हजार रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय...केंद्र सरकारची लाडकी योजना असल्याचा दावा केल्याने चर्चांना उधाण आलंय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली... त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात...

Sandeep Chavan

गावातील महिलांना आता दरमहा 5 हजार रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय...हा मेसेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय...केंद्र सरकारची नवी योजना असल्याचा दावा करून गावातील महिलांना पैसे दिले जाणार असल्याचं सांगण्यात आलंय...पण, खरंच सरकारची अशी योजना आहे का...? जर योजना असेल तर त्याचे काय निकष आहेत...? कुणाला याचा लाभ मिळणार आहे...? याची माहिती आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

केंद्र सरकार गाव की बेटी योजनेअंतर्गत देशभरातील सर्व गावांमधील महिलांना दरमहा 5 हजार देणार आहे.

हा दावा केल्यामुळे खरंच सरकार महिलांना पैसे देणार आहे का...? लाडकी बहिण प्रमाणेच ही योजना आहे का...? या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय करावं लागेल...याची आम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला...ही योजना केंद्र सरकारची असल्याचा दावा केल्याने आम्ही सरकारकडून माहिती मिळवली...त्यावेळी PIBने याबाबत काय माहिती दिली पाहुयात...

गाव की बेटी अशी केंद्र सरकारची योजना नाही

गावातील महिलांना दरमहा 5 हजार देणार हा दावा खोटा

खोटी माहिती आणि दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहा

पैसे देण्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जातेय...त्यामुळे अशा चुकीच्या माहितीकडे लक्ष न देऊ नका...सर्वसामान्य जनतेमध्ये चुकीची माहिती पसरवण्याच्या उद्देशाने तयार केलेले व्हिडिओ शेअर करू नका. कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवण्यापूर्वी किंवा ती शेअर करण्यापूर्वी, नेहमी अधिकृत माहिती मिळवा...तसेच सरकारची योजना असल्यास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती मिळवा...आमच्या पडताळणीत लाडकींना केंद्राकडून महिन्याला 5 हजार मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC कार्यालयाच्या वॉशरूममध्ये दारूच्या बाटल्या; महापालिका कार्यालयात नेमकं चाललंय काय?

कोल्हापूरच्या ड्रग्सचे कनेक्शन थेट चीन, हाँगकाँगपर्यंत; महाराष्ट्रात ९ महिन्यात ६१९ कोटींचं अमली पदार्थ जप्त

Maharashtra News Live Update: मुंबईकडून कर्जतकडे जाणाऱ्या फास्ट लोकल धीम्या गतीने

पुणे विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट! शिंदे गटाकडून सचिन सानप यांना उमेदवारी शिवसेनेचा भाजपला 'दे धक्का'

ठाकरे गटाचे आणखी आमदार, खासदार फुटणार? बड्या नेत्याच्या ‘मिशन टायगर’ विधानाने राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT