Ganpati Idol Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Ganpati Idol Viral Video: फक्त पिंपळाच्या पानांपासून गणेशाची 42 फूट उंच मूर्ती; दर्शनासाठी भक्तांची गर्दी, व्हिडीओ व्हायरल

Peepal Leaf Ganpati Idol: पिंपळाच्या पानांपासून बनवलेली 42 फूट उंचीची एक मूर्ती देखील तुफान व्हायरल झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tamilnadu Ganpati Viral Video:

गणपती बाप्पा आपल्यावर आलेली सर्व विघ्न दूर करतो त्यामुळे त्याला विघ्नहर्ता असं म्हटलं जातं. राज्यात आणि संपूर्ण देशभरात आज ठिकठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. नागरिक गणपतीची मनोभावे सेवा करत आहेत. अशात गणपती मूर्ती आणि डेकोरेशनचे देखील अनेक व्हिडीओ समोर आलेत. (Latest Ganpati Viral Video)

सोशल मीडियावर गणपती बाप्पाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतानाच पिंपळाच्या पानांपासून बनवलेली 42 फूट उंचीची एक मूर्ती देखील तुफान व्हायरल झाली आहे. संपूर्ण मूर्तीमध्ये फक्त पिंपळाच्या पानांचा वापर करण्यात आला आहे.

30 हजार दिव्यांचा वापर

गणपती बाप्पाची 42 फुटांची मूर्ती म्हणजे फार मोठी मूर्ती झाली. ही मूर्ती बनवण्यासाठी पिंपळाच्या पानांसह 30 हजार दिव्यांचा देखील वापर करण्यात आला आहे. मूर्ती इतकी सुंदर आणि आकर्षक बनली आहे की, कोणालाही या मूर्तीवरून आपली नजर हटवावी वाटत नाही.

गणपतीची ही मूर्ती चेन्नईमधील कोलाथूर येथील आहे. देशभरातून भाविक ही मूर्ती पाहण्यासाठी येथे येत आहे. अनेक व्यक्तींनी गणपतीच्या या मूर्तीचे व्हिडीओ रेकॉर्ड केलेत. तसेच सोशल मीडियावर पोस्ट केलेत. त्यांचे हे व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

आज 19 सप्टेंबर रोजी घरोघरी आणि मंडळांमध्ये गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 27 सप्टेंबर म्हणजेच 10 दिवसांनी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT