Ganpati Bappa Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमधून गणपती बाप्पाचा प्रवास, Video सोशल मीडियावर व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ganpati Bappa Travel By Mumbai Local

गणपती बाप्पांचे आगमन लवकरच होणार आहे. मोठ्या मंडळांमध्ये तर बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर बाप्पाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ढोल ताशा, लेझीम, डान्स अशा वातावरणात मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन होत आहे. अशातच बाप्पाने रेल्वेने प्रवास केला आहे. याचा व्डिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाप्पाचे आपण जोरदार वाजतगाजत स्वागत करतो. मोठ्या कारमधून बाप्पाला घरी घेऊन जातात. अशातच एकाने बाप्पाने चक्क ट्रेनचा प्रवास घडवला आहे. बाप्पाला मोठ्या गर्दीतून वाट काढत सीटवर बसवले आहे.

मुंबई लोकल म्हटलं तर गर्दी आणि भांडण एवढंच आपल्याला आठवतं. परंतु मुंबई लोकलमध्ये आता बाप्पानेदेखील प्रवास केला आहे. ज्या लोकलमध्ये जागेसाठी भांडण व्हायची त्याच सीटवर बाप्पा अगदी थाटात बसलेला दिसत आहे. मुंबईकरांची जान असलेल्या लोकलने लाडक्या बाप्पाने प्रवास केला आहे.

'मुंबई Matters' या एक्स (ट्विटर)वरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मोठ्या गर्दीतून एका सीटवर बाप्पा बसलेला दिसत आहे. बाप्पाच्या आजूबाजूला अनेक लोक बसलेले दिसत आहे. बाप्पाच्या बाजूला बसलेला एक मुलगा मूर्तीला हात लावून बसलेला आहे. धावत्या ट्रेनमध्ये बाप्पाला धक्का लागू नये म्हणून त्याने मूर्तीला हात लावला आहे. बाप्पाने भक्ताच्या घरी विराजमान होण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास केला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर 'मुंबईचा लाडका बाप्पा मुंबई लोकलने प्रवास करत आहे' असं कॅप्शन दिले आहे. बाप्पाच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT