Viral Funny VIDEO  SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Viral Funny VIDEO : इंजेक्शन पाहून रुग्णांची पाचावर धारण; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fuuny Viral Video

इंजेक्शन म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांचा थरकाप उडतो. डॉक्टरची औषधे खाण्यासाठी अनेकजण तोंड मुरडतात. पण इंजेक्शनच्या नावाने काहीना एवढी भीती असते की ते हॉस्पिटलला जायचे नावच घेत नाही.

सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील पोट धरुन हसाला याची खात्री आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती इंजेक्शन टोचत असताना अगदी लहान मुलांसारखा रडताना दिसत आहे. व्यक्तीची ही अवस्था पाहून डॉक्टरसह उपस्थितांना हसू आवरलं नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसतंय की, आजारी व्यक्ती रुग्णालयात एका खुर्चीवर बसलेली आहे. आता आपल्याला इंजेक्शन देणार या भीतीने ही व्यक्ती आधीच भेदरली आहे. आजारापेक्षा उपचार भयंकर अशी अवस्था या व्यक्तीची झाली आहे.

जेव्हा डॉक्टर इंजेक्शन देतात तेव्हा त्या व्यक्तीला दुसऱ्या बाजूस बघण्यास सांगतात. तरीही तो व्यक्ती इंजेक्शनकडे बघत असतो. इंजेक्शन दिल्यानंतर खुर्चीवर बसलेला व्यक्ती एखाद्या लहान मुलांसारखा रडताना दिसत आहे. रुग्णाची ही अवस्था पाहून डॉक्टरांनासुद्धा हसू आवरलं नाही.

@KalyugKaRavan_या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 'कुछ मरीज,ऐसे भी', असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. नेमका हा व्हिडीओ कुठला आहे हे समजले नाही. सदर व्हिडीओ तिथे उपस्थित असलेल्या कोणत्यातरी व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया आता येत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT