Boy Funny Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Funny Video: झोका घ्यायला गेलेल्या तरुणाने झाडच पाडले, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

Youth Fell Down From Swing Tree Video: झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर झोका घेत असताना एक तरूण खाली पडतो. त्याच्या वजनाने झाडच पडते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Priya More

सोशल मीडियावर (Social Media) बरेच इंटरेस्टिंग व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील काही व्हिडीओ असे असतात जसे की आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर त्या ठिकाणाची आठवण म्हणून मोबाईलमध्ये कैद करायला जातो आणि काही तरी मजेशीर किस्सा घडतो. आपण व्हिडीओ शूट करण्यासाठी केलेला एखादा प्रयत्न फसतो त्याचा हा व्हिडीओ असतो. अशा घटना घडतात तेव्हा आपल्याला पण हसू आवरत नाही. मग नेटकऱ्यांना तरी कसं हसू आवरेल. असाच एक सर्वांना हसवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर झोका घेत असताना एक तरूण खाली पडतो असा हा व्हिडीओ असून तो सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

एक तरुण फिरण्यासाठी कुठे तरी गेला आहे. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेताना हा तरुण एका झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर बसतो. खूप वेगाने तो झोका घेऊ लागतो. पण अचानक झाडाची फांदी तुटते आणि तरूण जमिनीवर आदळतो. या तरुणाने विचार सुद्धा केला नसेल की त्याच्यासोबत असे काही घडेल. हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की नेटकरी पोट धरून हसत आहे. झोका घेण्याच्या नादात तरुणाची जी अवस्था झाली आहे ते पाहून प्रत्येक जण हसत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका जंगलामध्ये कार उभी राहिलेली दिसत आहे. याठिकाणी खूप झाडे दिसत आहेत. पांढरा टी शर्ट आणि ब्लॅक पँट परिधान केलेला एक तरुण दोरीच्या सहाय्याने झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर बसलेला आहे. झोका घेताना या तरुणाला त्याच्या बालपणीच्या दिवसांच्या आठवणी ताज्या करायच्या आहेत असे वाटते. या तरुणाचे वजन देखील जास्त आहे. तो झोका घ्यायला जातो आणि झाडाची फांदीच तुटते. तसा हा तरुण तोंडावर खाली पडतो. अशाप्रकारे झोका घेणं या तरुणाला चांगलेच महागात पडले.

हा तरुण ज्यापद्धतीने झोक्यावरून खाली पडला त्यावरून त्याला चांगलीच गंभीर दुखापत झाली असावी असे दिसते. हा व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरून हासत आहेत. ऐवढच नाही तर नेटकरी यावर अनेक मजेशीर कमेंट्स देखील करत आहेत. iamchirag_mehta नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. एका यूजरने लिहिले आहे की, 'भाऊ भाग्यवान होता की तो फांदीच्या खाली पडला नाही.' दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, 'मी स्विंग खूप तुटताना पाहिली आहे, परंतु हे लाखोमध्ये पहिल्यांदाच पाहिले आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT