Sultanpur Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Sultanpur Viral Video: डोक्याला ताप! प्रेयसीला वाचवणाऱ्या प्रियकराला मच्छिमारांचा चोप; काय आहे प्रकार?

Sultanpur Viral Video: उत्तर प्रदेशामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आपल्या प्रेयसीला वाचवणाऱ्या प्रियकरास चांगला चोप मिळाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तर प्रदेशातील सुलतानपुरमधील जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नदी बुडणाऱ्या एका तरुणाला मच्छीमाराने बाहेर काढले आहे. मात्र त्यानंतर त्याला पाण्यातून बाहेर काढताच त्याला चांगलाच चोप दिला आहे. बुडणाऱ्या तरुणाने मद्यधुंद अवस्थेत मुलीला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुलतानपुरमधील गोलाघाट पुलावरुन काही दिवसांपूर्वी गोमती नदीत उडी घेतलेल्या तरुणीला वाचवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नदीत उडी घेतलेली तरुणी सुलतानपुर येथे तिच्या कुटुंबियासोबत वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी तिचे आणि तिच्या आईशी वाद झाले होते. त्यात आईचा(mother) ओरडा सहन न झाल्याने रागाच्या भरात तरुणीने गोमती नदीत पुलावरुन उडी मारली. त्याचवेळी तिच्यासोबत असलेल्या तिच्या प्रियकरानेही देखील नदीत उडी मारली.

प्रेमीयुगुलाने नदीत उडी मारल्याचे समजताच नदी(river) काठावर असलेल्या मच्छीमारांनी नदीकडे धाव घेतली. तात्काळ नदीत उडी मारुन त्यांचा जीव वाचवला. पाण्यातून बाहेर काढताना तरुणी बेशुद्ध अवस्थेत होती मात्र मच्छीमारांनी त्या तरुणाला चांगला चोप दिला आहे. यात प्रियकराने तिच्या प्रेयसीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यालाच मार मिळाला आहे. दोंघानाही जवळील रुग्णालयात नेण्यात आले.सध्या मच्छीमारांनी तरुणांला चोप दिल्याचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत, तुम्हाला नदीचा परिसर दिसून येत आहे. त्यात तरुणाने नदीत उडी घेतल्यानंतर तिथे असलेल्या मच्छीमार तरुणाला बाहेर काढताना दिसून येत आहे. ज्या क्षणी तरुणाला नदीच्या काठावर आणतो त्याला मच्छीमार चांगलाच चोप दिण्यास सुरुवात करतो. सर्व व्हिडिओ पुलावर असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या मोबाईलमध्ये कैद (captivity) केला असून @askrajeshsahu या अकाऊटवर शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT