Woman Fight Viral Video: SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Woman Fight Viral Video : धावत्या बसमध्ये महिलांची 'चप्पल फाईट'; विंडो सीटवरुन फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

Woman Fight Viral Video: धावत्या बसमध्ये दोन महिलांमध्ये कडाक्याच्या भांडणानंतर हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Woman Fight Viral Video On Social Media

धावत्या बसमध्ये दोन महिलांमध्ये कडाक्याच्या भांडणानंतर हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंजाब शहरातील परिवहन सेवेतील बसमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

बसमधील सीटवर बसण्यावरून दोघींमध्ये वाद झाला. या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. हे भांडण तिथेच असलेल्या कुणी सहप्रवाशानं मोबाइलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा व्हिडिओ पंजाबमधील एका शहरातील असल्याचे एक्सवरील यूजरनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. शहर परिवहन सेवेच्या बसमध्ये दोन महिलांमध्ये वाद झाला. शाब्दिक चकमकीनंतर दोघींमध्ये हाणामारीच झाली. एकमेकींचे केस ओढताना आणि लाथाबुक्क्या मारत आहेत.

हाणामारी सुरू असतानाच एकीनं तर चक्क सीटवर उभं राहून दुसऱ्या महिलेला मारल्याचे त्या व्हिडिओत दिसते. बसमध्ये असलेली सहप्रवासी महिला त्या दोघींचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. तिनं हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण दोघीही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. या घटनेचा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची सत्यता आम्ही पडताळून पाहिलेली नाही.

@gharkekalesh या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ही घटना पंजाबची आहे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र, नेमकी घटना कुठे घडलीये, हे समजू शकलेले नाही.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडिओ हजारोंच्या संख्येने बघितला गेला आहे. तर तितक्याच प्रमाणात तो शेअरही झाला आहे. असं भांडण कधीच पाहिलं नाही, बसमध्ये महायुद्धच सुरू आहे, अशा प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. बसपेक्षा मेट्रोच परवडली, अशा शब्दांत काहींनी टीका केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

Khana Saree Contrast Blouse: लग्नसमारंभासाठी खणाच्या साडीवर सुंदर दिसतील हे ७ ट्रेंडी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाइन्स

Maharashtra Live News Update : सराईत गुन्हेगार टिपू पठाण यांच्यासह सात जणांवर तिसऱ्यांदा मोक्का कारवाई

LPG shortage : देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा, खासदारांना संसदेत चहा-कॉफीही मिळेना, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Summer Tips : उन्हाळ्यात पुदिना अन् कोथिंबीर जास्त दिवस फ्रेश ठेवण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT