Bihar Police Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Bihar Police Viral Video : खाकी वर्दीतले दोन पोलीस रस्त्यातच भिडले, VIDEO व्हायरल

Bihar News : दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांवर कारवाई झाली आहे.

प्रविण वाकचौरे

Bihar News :

कायदा सुव्यस्था राखण्याचं काम करणारे पोलीस भररस्त्यात भिडल्याची घटना समोर आली आहे. बिहार पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ आहे. सोहसराय रेल्वे थांब्याजवळ ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ही मारहाण झाली आहे.

आधी धक्काबुक्की आणि नंतर लाथा-बुक्क्या आणि काठीने दोघांनी एकमेकांवर हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई झाली आहे. (Viral Video)

व्हिडीओमध्ये एक पोलीस दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर पैसे घेतल्याचा आरोप करत आहे. अवैध पैसे वसुलीच्या कारणावरुन दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. उपस्थित नागरिकांनी दोन्ही पोलिसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. (Latest News Update)

व्हिडीओमध्ये दिसत आहे त्यानुसार, आधी दोन्ही पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांवर हात उचलण्यास सुरुवात केली. यानंतर एका पोलिसाने गाडीतून काठी काढली आणि दुसऱ्या पोलिसाने झाडावरून काठी तोडली. यानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दरम्यान, हा व्हिडिओ संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, दोन्ही पोलिसांच्या कृत्याने पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करून विभागीय कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

सात, आठ की नऊ? सकाळचा नाश्ता करण्याची नक्की योग्य वेळ कोणती?

Rice Kheer Recipe: गोडधोड खाण्याची इच्छा झालीय? घरच्या घरी बनवा स्वादिष्ट तांदळाची खीर; वाचा सोपी रेसिपी

बाद की नाबाद? अंपायरनं दिलं आऊट, गुजरातचं फुल सेलिब्रेशन; तरी मैदान सोडेना कोहली; कॅचवरून उडाला गोंधळ

LPG Cylinder Price: सकाळ सकाळी महागाईचा झटका, 'हा' गॅस सिलिंडर महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

SCROLL FOR NEXT