Father daughter dance Viral Video SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Father daughter dance Viral Video: बाप लेकीची जबरस्त जुगलबंदी; रोमॅन्टीक गाण्यावरील डान्सचा VIDEO जोरदार व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर बाप-लेकीच्या निरागस प्रमाचे आजवर बरेच व्हिडीओ व्हायरल झालेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Father daughter dance Viral Video

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लेकही कायमच वडिलांची लाडकी असते असं म्हणतात .सोशल मीडियावर बाप-लेकीच्या निरागस प्रमाचे आजवर बरेच व्हिडीओ व्हायरल झालेत. अशातच सोशल मीडियावर वडील आणि मुलीच्या धम्माल डान्सच्या जुगल बंदीचा रिल्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहु शकता की,चिमुकलीनं एक गुलाबी रगांचा ड्रेस घातलेला आहे. तिच्या सोबत तिचे वडील ही डान्स करताना तिला साथ देत आहेत. दोघ 'बुलेट वाली' या गाण्यावर रिल्स बनवत आहेत. चिमुकली मुलगी या गाण्यातील सर्व डान्स स्टेप्स अगदी मस्त करत आहे. तसंच तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून सर्वच तिचं कौतुक करत आहेत.

@sumitkhare16 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हायरल व्हिडीओच्या कॅपशनमध्ये लिहील आहे की, 'कोणाचा डान्स आवडला तुम्हाला'...?. जन्मलेल्या मुलीला पहिल्यांदा हातात घेतल्यावर प्रत्येक वडिलांच्या डोळ्यांत नकळत पाणी येतं आणि तिथूनच बाप आणि लेकीच्या अनोख्या प्रवासाची सुरुवात होते.

सोशल मीडियावरसुद्धा अशा अनोख्या जोडीनं धुमाकूळ घातला आहे. वडील आणि चिमुकल्या मुलीचा एक अनोखा डान्स बघायला मिळाला आहे ज्यानं सर्वांची मन जिंकलीत आहेत.

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया केल्यात. इंस्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हायरल व्हिडीओ हजारहुन अधिक लोकांनी पाहिलाय. अनेक यूजर्संनी म्हटल की, मीसुद्धा भविष्यात माझ्या मुलीसोबत असा डान्स करीन. तसंच काही नेटकऱ्यांनी चिमुकल्या मुलीचं भरभरुन कौतुक केलय. या व्हिडीओमधील मुलीचा गोंडस डान्स लोकांना जास्त आवडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Historical Place : नवी मुंबईजवळ ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? मग ही Top 8 हिडन ठिकाणे पाहाच

नांदेडमध्ये रक्ताचा सडा! गँगवारच्या २४ तासांतच पुन्हा एक हत्या, शहरात दहशतीचे वातावरण

Nose Bleeding: उन्हाळा सुरू होताच नाकातून रक्त येतंय का? हे संकेत दिसले तर लगेच डॉक्टरांकडे जा

Maharashtra Live News Update : नांदेड शहरात 24 तासात चौथा खून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न

सतत थकवा, केस गळती आणि सांधे दुखी जाणवतेय? असू शकते 'या' व्हिटॅमिन्सची कमतरता, वेळीच बदला या 5 सवयी

SCROLL FOR NEXT