Uncles Lavani Dance Video Goes Viral Instagram
व्हायरल न्यूज

Uncle Dance Viral Video : पेट्रोल पंपवाल्या काकांची भन्नाट लावणी, ठुमके पाहून नेटकरी म्हणाले, 'तुमच्यापुढे गौतमी पाटील फिकी'

Viral Video : सध्या सोशल मीडियावर काकांचा नादखूळा डान्स व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Uncles Lavani Dance Video Goes Viral

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो. सध्या सोशल मीडियावर काकांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी गौतमीला ही टक्कर देत एकदम ठसकेबाज लावणी सादर केली आहे. सध्या त्यांच्या लावणीची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. अशातच इंटरनेटवर एका काकांचा नादखूळा डान्स व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही लोटपोट हसाल, यात काही शंका नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या सोशल मीडियावर एका काकांच्या लावणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तो व्हिडीओ पाहून अनेकांना गौतमी पाटीलची आठवण येऊ शकते. काकां इतकी अप्रतिम लावणी पाहून तुम्हीही त्यांच्या लावणीचे फॅन व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसेल की काका कंबर लचकवत लावणीचा ठेका धरताना दिसत आहे. काकांच्या लावणी स्टेप्स आणि हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्यांचा हा उत्साह आजच्या तरूणाईलाही लाजवेल असा आहे.

@UmeshMahale13नावाच्या एका इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ या गाण्यावर काका नाचताना दिसत आहेत. एखाद्या मुलीलाही करता येणार नाही अशा हूक स्टेप्स या काकांनी सादर केल्या आहेत. इन्स्टाग्रामवरील या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. या व्हायरल इन्स्टाग्राम रीलवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सध्या या व्हिडीओची इंटरनेटवर तुफान चर्चा होत आहे. व्हिडीओला झपाट्याने ६५ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. इंटरनेट वापरकर्ते या काकांचा उत्साही डान्स व्हिडिओ पाहून त्यांच्या डान्सचे कौतुकही करत आहेत. एका यूजरने म्हटले की, "प्रत्येकाने असे आनंदी राहायला हवे." आणखी एका युजरने लिहिले आहे की, "साहेब असाच जीवनाचा आनंद लुटा. जिंदगी ना मिलेगी दोबारा." तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, "वय फक्त एक संख्या आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT