सोशल मीडियावर विविध खाद्यपदार्थांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसंच खाद्यपदार्थ बनवतानाचे देखील अनेक व्हिडीओ सोशल मीडिया पेजवर शेअर केले जातात. जेवण बनवताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घेणे गरजेचे असते. अस्वच्छ पद्धतीने पाणीपुरी बनवतानाचे अनेक व्हिडिओ आजवर व्हायरल झालेत. अशात आता घाणेरड्या पद्धतीने पेठा बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)
व्हायरल व्हिडिओत, पेठा तयार करण्याची संपूर्ण कृती दाखवलीये. व्हिडिओमध्ये सर्वात पहिल्यांदा भोपळा कापून त्याचे चार काप करून मधला भाग काढण्यात आलाय. त्यानंतर त्याची साल काढून तो बाजुला ठेवतात. मग सोललेला भोपळा एका मशिनमध्ये टाकला जातो.
पुढे यातील बिया वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर एका मोठ्या कढईतल्या पाण्यात टाकले जाते. त्या कढईवर मोठ्या फळ्या टाकून एक व्यक्ती त्यावर बसतो आणि कापलेल्या भोपल्याचे चौकोनी तुकडे करून कढईत टाकतो. नंतर ते दुसऱ्या भांड्यात टाकून त्यात पाणी सोडले जाते.
त्याच पाण्यात काही कामगार तोंड धूताना दिसत आहे. काही व्यक्तींनी यात तोंड हात पाय धुवून घेतलेत. नंतर पाण्यातून काढून ते काप एका मोठ्या कढई टाकले आहेत. व्हिडीओमध्ये पुढे त्यात पाढंऱ्या रंगाचा पावडरसारखा पदार्थ टाकला जातो आणि त्यात उकळवलं जातं. त्यानंतर त्यातून हे मिश्रण काढून त्याला साखरेच्या पाकात टाकलं जातं. तयार झाला फेमस आग्रा पेठा.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ @theyyummyMania या इंस्टापेजवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. तसंच अनेकांनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान या व्हिडिओला आतापर्यंत ८.६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावरचा हा व्हिडीओ पाहून आम्ही पून्हा पेठा खाणार नाही असं म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.