Dj  Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Fact Check about loud music side effects : आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी...तुम्ही डीजेच्या तालावर नाचत असाल तर वेळीच सावध व्हा...कारण, डीजेमुळे रक्त गोठून नसा फाटू शकतात...डीजेच्या आवाजामुळे एका तंदुरुस्त व्यक्तीला ब्रेन हॅमरेज झाल्याचा दावा करण्यात आलाय...त्यामुळे आम्ही या मेसेजची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..

साम टिव्ही

संदिप चव्हाण, साम टीव्ही

मुंबई : सावधान...! तुम्ही जोरजोरात डीजेचा आवाज वाढवून नाचत असाल तर सावध व्हा. कर्णकर्कश्श आवाजात डीजेवर थिरकणं जीवावर बेतू शकतं. अशाच प्रकारे एका 40 वर्षीय व्यक्तीला डीजेवर नाचणं महागात पडलंय. डीजेच्या आवाजामुळे या व्यक्तीच्या मेंदूचं रक्त गोठलं आणि त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याचा दावा करण्यात आलाय.

व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय पाहुयात... डीजेमुळे छत्तीसगडमध्ये एका 40 वर्षीय व्यक्तीची मेंदूची नस फाटली आणि त्याला ब्रेन हॅमरेज झालं. या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ब्रेन हॅमरेज झालेल्या व्यक्तीला कुठलाही आजार नव्हता. ब्लड प्रेशरही नॉर्मल होतं, असं त्यात मेसेजमध्ये म्हटलं आहे.

ज्या व्यक्तीला डीजेमुळे ब्रेन हॅमरेज झालाय त्याला कुठलाही आजार नव्हता. तरीदेखील या व्यक्तीला डीजेच्या आवाजाचा त्रास झालाय. संजय जैस्वाल असं या व्यक्तीचं नाव असून, 40 वर्षांचा आहे. छत्तीसगडचा रहिवासी आहे. तंदुरुस्त असतानाही त्याला डीजेच्या आवाजाचा त्रास झालाय. त्यामुळे काय खबरदारी बाळगायला हवी हे आम्ही एक्सपर्टकडून जाणून घेतलं.

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलंय पाहुयात...

डीजेचा कर्णकर्कश आवाज सगळ्यांनाच सहन होत नाही

डीजेचा आवाज 150 डेसीबल पेक्षाही अधिक असतो

माणूस जास्तीत जास्त 70 डेसीबल ध्वनीची तीव्रता सहन करु शकतो

कर्णकर्कश आवाजामुळे मेंदूवर अत्यंत वाईट परिणाम होतो

शरीरातील रक्त गोठून नसा फाटू शकतात

छत्तीसगडमध्ये एका तरुणाचं रक्त गोठून मेंदूतील नसा फाटल्या.

गणेशोत्सवासह अनेक सण-उत्सवाच्या मिरवणुकीत, लग्नात, हळदी कार्यक्रमात जोरजोरात डीजे वाजवला जातो. मात्र, कर्णकर्कश्श आवाजामुळे अनेकांना त्रास होतो. लहान मुलं, गर्भवती, वृद्ध, आजारी असलेल्यांना या आवाजाचा त्रास होतोच. मात्र, आता ठणठणीत असलेल्यांनाही डीजेचा त्रास होत असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. आपण सण साजरे करताना ढोल-ताशे-डीजे लावून नाचतो. मात्र, आवाज कमी प्रमाणात ठेवून उत्सव साजरा केला तर याचा कुणालाच त्रास होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT