"Viral claim about ₹5,000 scheme for village women turns out to be false – Fact Check Report Saam Tv
व्हायरल न्यूज

Ladki Bahin Yojana: ग्रामीण लाडकींना मिळणार 5 हजार? केंद्र सरकारची गावातील महिलांसाठी योजना?

Fact Check: गावातील लाडकी बहिणींना आता 5 हजार रुपये मिळणार आहेत...केंद्र सरकारची ही योजना असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच सरकारने गावातील लाडकींना 5 हजार रुपयांची योजना सुरू केलीय का...? याची आम्ही पडताळणी केली

Sandeep Chavan

..लाडकी योजनेप्रमाणेच आता गावातील लाडकींना 5 हजार रुपये देणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...आधीच लाडकींना महाराष्ट्र सरकारकडून दीड हजार रुपये मिळतायत...यामुळे लाडकींमध्ये आनंदाचं वातावरण आहे...पण, खरंच सरकारने गावातील लाडकींसाठी अशी योजना आणलीय का...? केंद्र सरकारची ही योजना असेल तर त्यासाठी काय अट आहे...? अर्ज कसा भरायचा...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली

...हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांना हे खरं वाटू लागलंय...काहींनी तर ही लिंकही उघडून पाहिली...मात्र, कुणाला याबद्दल माहिती मिळाली नाही...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने या मेसेजची पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती मिळवली...

केंद्र सरकारची गाव की बेटी योजना नाही

गावातील महिलांना 5 हजार रुपये देण्याचा दावा खोटा

अशा मेसेजसंदर्भात पाठवलेली लिंक उघडू नका

लोकांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल

आमच्या पडताळणीत गाव की बेटी योजनेअंतर्गत ग्रामीण महिलांना 5 हजार रुपये मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...त्यामुळे अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका...कारण, पैशांचं आमिष दाखवून गंडा घालण्याचा हा डाव असू शकतो..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला मोठं खिंडार, अनेक बडे नेते, संरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Asim Sarode On Atharva Sudame: अथर्व सुदामेसाठी असीम सरोदे मैदानात, थेट राज ठाकरेंना लावला फोन| पाहा व्हिडिओ

Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद

Indian Festivals: दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत; वाचा मुहूर्त, वार आणि तारीखसह सणांची यादी

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत संघर्ष? शिंदेंच्या खात्यावर फडणवीस नाराज?

SCROLL FOR NEXT