Speaker Om Birla’s Viral Video Misused to Spread Fake Welfare Scheme Saam Tv
व्हायरल न्यूज

गरिबांना 12 हजार मिळणार? गरिबांसाठी केंद्र सरकारची योजना?

Fact Check: हा व्हिडिओ आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा...आता गरिबांना केंद्र सरकार 12 हजार रुपये देणार असल्याचा दावा या व्हिडिओतून करण्यात आलाय...गरिबांना 10 वर्षांसाठी ही योजना लागू असेल असंही या व्हिडिओतून ऐकायला मिळतंय...पण, खरंच केंद्र सरकारने अशी कोणती घोषणा केलीय का...? कारण या व्हिडिओत लोकसभा अध्यक्ष दिसत असल्याने अनेकांना यावर विश्वास बसलाय...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली...

Sandeep Chavan

या व्हिडिओ दावा केलाय की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाख आहे...अशा कुटुंबातील कुटुंब प्रमुखाला 12 हजार रुपये मिळणारायत...स्वावलंबन आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत केंद्र सरकारची योजना आहे...आणि 10 वर्षांसाठी सरकार 12 हजार मदत देणार आहे...22 डिसेंबरपासून फायदे उपलब्ध होतायत...पण, खरंच अशी केंद्राची योजना आहे का...? लोकसभा अध्यक्षांनी ही घोषणा केलीय का...? या दाव्यात तथ्य आहे का...? याची पडताळणी करण्यासाठी आमच्या टीमने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला...मात्र, अशी योजनाच नसल्याचं समोर आलं...मग हा व्हिडिओ कुणी व्हायरल केला...याची पडताळणी केली...

ओम बिर्लांचा व्हिडिओ डीपफेक करण्यात आलाय

गरिबांसाठी आर्थिक सहाय्यता स्वावलंबन योजना नाही

गरिबांसाठी 12 हजार रुपयांची केंद्राची योजना नाही

व्हिडिओतील आवाज लोकसभा अध्यक्षांचा नाही

या अधिवेशनातील ओम बिर्ला यांचा व्हिडिओ वापरून व्हिडिओत एआय क्लोन केलेला आवाज जोडला...या व्हिडिओत कुठेही योजनेचा उल्लेख नाही...ओम बिर्ला हे धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहत असल्याचं ऐकायला मिळतंय...आणि हाच व्हिडिओ वापरून खोटा आवाज लावण्यात आला...त्यामुळे आमच्या पडताळणीत गरिबांना सरकार 12 हजार देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT