millionaire beggar who lends money Saam Tv
व्हायरल न्यूज

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Fact check: व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची आम्ही पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो. आता एक मेसेज व्हायरल होतोय की करोडपती भिकारी कर्ज देतोय. पण, कोण आहे हा करोडपती भिकारी? खरंच हा करोडपती भिकारी आहे का?

Shruti Vilas Kadam

Fact check: 3 महागडी घरं...3 रिक्षा...महागडी कार आणि कोट्यवधींची मालमत्ता...हा आहे करोडपती भिकारी...होय, ही व्यक्ती भीक मागून करोडपती झाल्याचा दावा करण्यात आलाय. यामुळे या भिकाऱ्याची देशभरात चर्चा होतेय. कोट्यवधींची मालमत्ता याने भीक मागून जमावल्याचा दावा करण्यात आलाय. पण, खरंच ही व्यक्ती करोडपती भिकारी आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

इंदूरमधील करोडपती भिकाऱ्याकडे महागडी घरं, कार आणि रिक्षाही आहेत. भीक मागून आलेल्या पैशातून ही माया जमवलीय. काही पैसे याने व्याजानेही लोकांना दिलेयत.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांनाच याची उत्सुकता लागलीय...खरंच ही व्यक्ती करोडपती भिकारी आहे का...? भीक मागून या व्यक्तीने एवढे पैसे कमावलेयत का...? याची पडताळणी सुरू केली. त्यावेळी आम्हाला मांगीलाल यांच्याकडूनच अधिक माहिती मिळाली.

अपंग असल्याने ते अपंगांच्या गाडीवरून सराफा परिसरात जायचे यायचे...इंदूरमधील भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेत त्यांना हे मांगीलाल आढळले.मांगीलाल यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे चक्क तीन घरं, तीन रिक्षा, एक कार आणि कोट्यवधींची मालमत्ता आढळलीय... भिकारी नसून, लोक त्यांना स्वच्छेने पैसे देतात...आमच्या पडताळणीत मांगीलाल हे करोडपती भिकारी असल्याचा दावा असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Fact Check: २५५० रुपये द्या अन् ५ लाख घ्या, PM मोदींच्या नावाने मिळतंय कर्ज? सरकारने दिली महत्वाची माहिती

देशाच्या राजकारणात खळबळ; राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देणार राजीनामा?

Ind vs Afg : भारताविरुद्ध वनडे, कसोटीसाठी टीम अफगाणिस्तान जाहीर; हुकमी एक्का संघाबाहेर

Shahi paneer Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही पनीर; पाहुण्यांनाही आवडेल खास रेसिपी

SCROLL FOR NEXT