FACT CHECK: AADHAAR CARD HOLDERS TO GET 1 TOLA GOLD? KNOW THE TRUTH saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: आधार कार्डधारकांना मिळणार 1 तोळा सोनं?मोफत सोनं देण्यासाठी सरकारची योजना?

Fact Check: आधार कार्डधारकांना सरकारकडून एक तोळा सोनं मोफत मिळणार असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पीएम मोदींच्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या दाव्याची सत्यता जाणून घ्या.

Sandeep Chavan

  • आधार कार्डधारकांना एक तोळा सोनं मोफत मिळणार असल्याचा दावा

  • या दाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओचा वापर करण्यात आलाय.

  • सरकारी योजनांबाबत माहिती मिळवताना अधिकृत सरकारी स्रोतांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन

आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना 1 तोळा सोनं मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय. पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ व्हायरल होतोय. पण, खरंच आधारकार्ड धारकांना एक तोळं सोनं सरकार देणार आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

हा व्हिडिओ पाहिलात. या व्हिडिओत मोदीच स्वत: घोषणा करत आहेत. त्यावेळी एक महिला आधारकार्डबद्दल दावा करतेय.पण, खरंच आधार कार्ड धारकांना 1 तोळा सोनं मिळणार आहे का? या दाव्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. कारण, प्रत्येकाकडे आधारकार्ड आहे. त्यामुळे या दाव्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.

हा व्हिडिओ मोदींच्या नावाने व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी योजनेबद्दल बोलत आहेत. या योजनेअंतर्गत, सरकार आधार कार्ड असलेल्या अर्जदारांना 1 तोळा सोने देणार आहे असा दावा करण्यात आलाय. पण, खरंच सर्व आधारकार्ड धारकांना 1 तोळा सोनं मिळणार आहे का? सध्या सोन्याची एक तोळा किंमत अंदाजे दीड लाख इतकी आहे. मग एवढं महागडं सोनं देण्याची अशी कोणती योजना आहे?

सगळ्यांसाठीच हा निर्णय घेण्यात आलाय का? हे खरं असेल तर एक तोळा सोन्यासाठी काय करावं लागेल? असे अनेक सवाल उपस्थित होतायत. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबत अधिक माहिती जाणून घेतली.सरकारची अशी योजना आहे का? हे तपासून पाहिलं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य

मोदींच्या नावाने व्हायरल होत असलेला व्हिडिओ बनावट

पंतप्रधान मोदींचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल

आधारकार्ड धारकांना 1 तोळा सोनं मिळणार नाही

पंतप्रधानांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही

असे व्हिडिओ व्हायरल करून त्यासोबत लिंकही व्हायरल केली जाते. सध्या आधारकार्ड हे सगळ्यांकडेच असतं. त्यामुळे अनेकजण अशा अफवांवर विश्वास ठेवून लगेच अर्ज भरतात. पण, असे मेसेज पाहून अर्ज भरल्यास फसवणूक होऊ शकते. त्यामुळे असे मेसेज आणि व्हिडिओ आल्यास त्यापासून सावध राहा. केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नसून, आमच्या पडताळणीत आधारकार्डवर सरकार 1 तोळा सोनं मोफत देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवसभर लेकीचा शोध घेतला, पण शेवटी शेतात जे दिसलं त्याने कुटुंब हादरलं! पुण्यातील 'त्या' घटनेने उडाली खळबळ

रात्रीत मोठा प्रशासकीय फेरबदल! एकाच झटक्यात ४३ IPS अधिकाऱ्यांची उचलबांगडी, पाहा कोणाची कुठे झाली बदली

Maharashtra News Live Update: एमपीएससी निकालात ‘महाज्योती’ची भरारी, १२३ बहुजन विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

मुख्यमंत्री फडणवीसच 'बिग बॉस'; मंत्र्यांच्या निर्णयावर फडणवीसांचाच निकाल

Wednesday Horoscope : 'या' राशींना आर्थिक लाभाचा योग; कोणाला घ्यावी लागणार विशेष काळजी? वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT