Extramarital Affair video: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिलेनं रस्त्याच्या मधोमध नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडलं. ज्याने पाहिलं त्याचं डोकंच फिरलं. हा प्रकार इतका नाट्यमय होता की आजूबाजूचे लोक देखील थबकले. काहींनी हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद करत सोशल मीडियावर टाकला आणि पाहता पाहता तो व्हिडिओ लाखोंच्या शेअरमध्ये पोहोचला.
माहितीनुसार, संंबंधित महिलेचे तिच्या पतीशी लग्न होऊन दहा वर्षे झाली आहेत. पण आता तिचा पती(Husband) दुसऱ्या महिलेसोबत राहत आहे. रस्त्यावर पाहिल्यानंतर पहिल्या पत्नीने तिच्या पतीला चपलेने मारण्यास सुरुवात केली. सर्व प्रकार अचानक झाल्याने रस्त्यावर पाहणाऱ्याची गर्दी जमली तर काहीजण वाहन थांबवून हा प्रकार पाहिला होता.
व्हायरल(Viral Video) होत असलेला हा प्रकार मध्य प्रदेशमधील बरेलीमधील असल्याचे समोर आले आहे. इन्स्टाग्राम, एक्स, फेसबूक अशा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ प्रत्येकाने पाहिला असून सध्या एक्सवरील @bstvlive वर अपलोड केलेला आहे. व्हिडिओ अपलोड करताच कॅप्शनमध्ये सर्व घटना काय घडली ते दिलेले आहे.
हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी बायकोच्या धाडसाचं कौतुक केलं, तर काहींनी नवऱ्याच्या वागणुकीवर टीका केली. काहींनी तर मीम्स बनवून या घटनेचा विनोदी पद्धतीने विचार केलेला आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.