Madhya Pradesh Viral Video: आज सर्वच भारतीय मोठ्या जल्लोषात ७७ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतायत. स्वातंत्र्य दिवस प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने साजरा करत असतो. यंदा हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. अशात एका आजोबांनी या अभियानातून प्रत्येक घराघरात तिरंगा पोहचावा यासाठी अनोखी शक्कल लढवलीये. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हर घर तिरंगा अभियानात संपूर्ण भारतातील नागरिक सहभागी व्हावेत असं आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केलं आहे. यामुळे सर्वजण आपल्या घरी तिरंगा फडकवत आहेत. प्रत्येक नागरिकाने यात सहभाग घ्यावा म्हणून एका आजोबांनी आपल्या चहाच्या टपरीवर तिरंगे विकण्यासाठी ठेवलेत. या तिरंग्यांची किंमत २० ते ५० रुपये इतकी आहे.
जी व्यक्ती हा तिरंगा विकत घेणार त्यांना आजोबा फ्रीमध्ये चहा पिण्यास देत आहेत. DSP संतोष पटेल यांनी त्यांच्या इंस्टा उकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केलाय. व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "देशभक्त आणि स्वाभिमानी वृद्ध रघुवीर दास, जे आपले गाव सोडून घाटीगावपासून 300 किमी अंतरावर एका झोपडीत राहतात.
त्यांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तहसीलसमोर चहाची गाडी उभी केली. 'हर घर तिरंगा अभियान' अंतर्गत आज तिरंगा फडकवणाऱ्यांना ते मोफत चहा देत आहेत. बाबांचा चहा आणि त्यांनी गायलेलं गाणं अप्रतिम आहे.", असं कॅप्शन लिहिलं आहे.
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेट केल्यात. अनेकांनी या आजोबांचे कौतुक केलेय. तर काहींनी त्यांचे आभारही मानलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.