Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : भांडण मिटवायला गेले अन् कौटुंबिक न्यायालयाबाहेरच भिडले; छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला अन् पुरुषांमध्ये तुफान हाणामारी

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे कौटुंबिक वादातुन घरातील सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बऱ्याचदा कौटुंबात लहान-मोठ्या गोष्टींवरुन वाद होत असतात. अनेकदा या भांडणाचे कारण ही काही क्षुल्लक गोष्टी असतात. मात्र अनेकदा कौटुंबिक वादाचे रुपांतर भयानक घटनेत बदलतानाही आपण पाहिले असेलच. त्यातच पुन्हा एका अशीच घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. ज्यात काही कौटुंबि कारणांवरुन थेट महिला आणि पुरुषांमध्ये भररस्स्यात हाणामारी झाली आहे. सध्या यांच्या हाणामारीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लीखाना येथे सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. सिल्लीखाना येथे एका कुटुंबात काही कारणांवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. रोजच्या वादातून काही तरी मार्ग निघावा यासाठी हे कुटुंब पोलिस आयुक्तालयाच्या दिलासा सेलमध्ये आले होते. मात्र या ठिकाणी आल्यावरही त्यांच्यामध्ये पुन्हा वाद सुरु झाले. मात्र कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादानंतर थेट रस्त्यात हाणामारी झाली आहे. ही हाणामारी थेट कुटुंबातील महिला आणि पुरुषांमध्ये झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत सर्व हाणामारी दिसून येत आहे.

गाडी न थांबवल्याचा राग, वाहतूक पोलिसांकडून तरुणाला भरचौकात बेदम मारहाण;

छत्रपती संभाजीनगरमधून ही घटना ताजी असताना काही दिवसांपूर्वी अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. ज्यात गाडी न थांबवल्याचा राग अनावर झाल्याने एका वाहतुक पोलिसाने तरुणाला बेदम मारहाण केली होती. त्यावेळी तो व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल ही झाला होता शिवाय त्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई होईलका असे अनेक प्रश्न उपस्थिक केले होते. संपूर्ण घटना ही वाळूज औद्योगिक परिसरातील एनआरबी चौकामध्ये २६ जून रोजी सांयकाळी घडली होती.

भररस्त्यात टोळक्याकडून जोडप्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

छत्रपती संभाजीनगरमधून वारंवार अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. त्यात छत्रपती संभाजीनगर शहरातील दिल्ली गेट परिसरातील शासकीय विश्रामगृहासमोर काही टवाळखोर टोळक्याने एका जोडप्याला बेदम मारहाण केली होती. या घटनेमुळे संपूर्ण शहर(City) हादरुन गेल होतं शिवाय या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Homeguard Recruitment : होमगार्डसाठी वयोमर्यादा किती आहे? जाणून घ्या महत्वाचे नियम अन् शेवटची तारीख

Maharashtra Nagar Parishad Live : शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी पकडलं

सिन्नरमध्ये मतदानावेळी वाद; अजित पवारांच्या उमेदवाराच्या समर्थकावर स्प्रे हल्ला, २ गटात तुफान हाणामारी|VIDEO

Alibaug Travel : अलिबागमध्ये लपलेले सुंदर रत्न, निसर्ग सौंदर्याने सजलाय 'हा' समुद्रकिनारा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मी आणि समरजीतसिंह घाडगे एकत्र आलो - मंत्री हसन मुश्रीफ

SCROLL FOR NEXT