Uttar Pradesh Viral Video:  Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: डॉक्टर पत्नी अन् २ प्रियकर, हॉटेलमध्ये रंगेहाथ सापडले; पतीने तिघांनाही बेक्कार धुतलं| VIDEO व्हायरल

Wife Caught With Lover Uttar Pradesh Viral Video: डॉक्टर महिलेला तिच्या पतीने दोन प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले. त्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नी अन् तिच्या दोन्ही प्रियकरांना बेदम मारहाण केली.

Gangappa Pujari

उत्तरप्रदेशच्या कासंगजमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कासंगज येथे एका डॉक्टर महिलेला तिच्या पतीने दोन प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले. त्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नी अन् तिच्या दोन्ही प्रियकरांना बेदम मारहाण केली. या हायहोल्टेज ड्राम्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काय आहे हे प्रकरण, जाणून घ्या सविस्तर.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तरप्रदेशमधील या दांपत्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे ते दोघेही वेगवेगळे राहत होते. डॉक्टर पत्नी कासगंज जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात कामाला आहे. तिच्या पतीला आपल्या पत्नीचे बाहेर संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे तो बऱ्याच दिवसांपासून पत्नीवर लक्ष ठेवून होता, असे सांगण्यात येत आहे. अशातच बुधवारी एका हॉटेलमध्ये त्याने पत्नीला दोन तरुणांसह रंगेहात पकडण्यात आले.

डॉक्टर पतीला हा प्रकार कळताच त्यांनी संपूर्ण कुटुंबासह हॉटेल गाठले आणि तिघांनाही खोलीच्या आत पकडले. यानंतर जोरदार हाणामारी झाली. यावेळी पतीने अक्षरशः पत्नीचे केस पकडून बेदम मारहाण केली. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्यात

दरम्यान, पतीने सांगितले की, त्याचे २०१३ मध्ये लग्न झाले होते. त्याच्या पत्नीचे तरुणाशी अनैतिक संबंध होते, तिने सासरच्यांना समजावून सांगितल्यास तिला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती. सुमारे एक वर्षापूर्वी ही महिला सासर सोडून दुसरीकडे राहायला लागली. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT