Smoky Pan saam tv
व्हायरल न्यूज

Smoky Paan: तुम्ही स्मोकी पान खाताय? सावधान ! पोटात होईल आग आणि पडेल छिद्र?

Smoky Paan : आता बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. तुम्ही स्मोकी पान खाता का? स्मोकी पान खात असाल तर ही बातमी नक्की पाहा.

Vinod Patil

स्मोकी पान खाताना येणारा धूर मजेशीर वाटतो. मात्र, तुम्हाला तो धूर आजारी पाडू शकतो... स्मोकी पान खाल्ल्याने तुम्हाला पोटाचा गंभीर आजार होऊ शकतो, असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय,त्यामुळे या दाव्याची आम्ही पडताळणी केली मग काय सत्य समोर आलं. चला पाहूयात.

स्मोकी पान, फायर पान खाताना चांगले लागतात... नाका तोंडातून धूर येतो.. मात्र, त्याचे गंभीर परिणाम नंतर पोटात होतात... पोटात आग निर्माण होऊन छिद्रही पडू शकतं इतका गंभीर परिणाम होऊ शकतो. असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय... याची सत्यता पडताळण्याआधी व्हायरल मेसेज काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

स्मोकी पान, फायर पान तुम्ही खात असाल तर सावध व्हायला हवं. स्मोकी पानामुळे पोटात गंभीर आजार होऊ शकतात. पोटातील अवयवांना छिद्र देखील पडू शकतं. स्मोकि पानाचं आकर्षण अनेकांना असतं. बरेचजण स्मोकी पान खातात. हा आरोग्याचा प्रश्न असल्याने याचे काय दुष्परिणाम आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने डॉक्टरांची भेट घेतली. त्यांना मेसेज दाखवला आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य

स्मोकी पानात लिक्विड नायट्रोजनचा धातू असतो.

1 एमएल लिक्वीड नायट्रोजनपासून 700 एमएल गॅस तयार होतो.

लिक्वीड नायट्रोजन पोटात गेल्यानंतर पोटावर प्रचंड ताण निर्माण होतो.

हा गॅस पोटातून बाहेर पडतो, त्यावेळी पोटाला छिद्र पाडतो.

पोटातील इतर अवयवांना देखील गंभीर धोका निर्माण .

गॅसचा धूर नाकात गेला तर श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो.

स्मोकी पान खाऊन त्रास झाल्याने काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये एका मुलीचा पोटाचा एक भाग कापून तो शिवावा लागला. हा कंपाउंड कार्सिनोजेनिक घातक आहे. याने कॅन्सर होण्याचीही शक्यता असते. तसेच फुफ्फुसाच्या देखील तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आरोग्यास घातक असलेले पदार्थ खाणं टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संजय राऊत यांनी शिवीगाळ केल्याने काही फरक पडत नाही - भरत गोगावले

Stomach cancer: दररोजच्या या ४ सवयी लावाच; पोटाच्या कॅन्सरचा धोका होतो ५० टक्क्यांनी कमी

Suhasini Mulay: सोशल मीडियावरून जुळल्या मनाच्या तारा; ६०व्या वर्षी प्रेमात पडली अभिनेत्री, अवघ्या ७५ दिवसांत बांधली लग्नगाठ

तांदूळ, ज्वारी की बाजरी? डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती भाकरी खावी?

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

SCROLL FOR NEXT