Desi Spiderman Shiva climbing down a deep well without any support – a daring feat that has gone viral on Instagram. Viral Video
व्हायरल न्यूज

Viral Video : देसी स्पायडरमॅनचा थरारक कारनामा, कोणत्याही सपोर्टशिवाय विहिरीत बिनधास्त उतरला-चढला

Instagram viral reels : कोणत्याही आधाराशिवाय विहिरीत चढणाऱ्या शिवा या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. फिटनेस प्रशिक्षक असलेला शिवा ‘देसी स्पायडरमॅन’ म्हणून ओळखला जात आहे. नेटकरी त्याच्या साहसाचं कौतुक करत आहेत.

Namdeo Kumbhar

Shiva the Fitness Trainer Becomes Viral Star With Daring Well-Climbing Feat : विहिरीच्या गोल भिंतींच्या दोन्ही कडांवर हात आणि पाय लावून कोणत्याही सपोर्टशिवाय एक तरूण खाली उतरतोय-वर येत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मिडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. त्या तरूणाचे नाव शिवा आहे. लोकांनी शिवाला देसी स्पायडरमॅन म्हणत कौतुक केले आहे. कोणत्याही सपोर्टशिवाय विहिरीत उतरणाऱ्या बिनधास्त शिवाचे नेटकरी कौतुक करत आहेत.

सोशल मिडियावर कधी काय व्हायरल याचा नेम नाही. पण देसी स्पायडरमॅनच्या व्हिडिओने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय. विहिरीत उतरताना त्या तरुणाने केलेल्या कसरतीने सर्वांना चकीत केलेय. त्या तरुणाचं नाव शिवा आहे. शिवा व्यावसायाने फिटनेस प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. शिवाचा व्हिडिओने समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल झाला आहे. कोणत्याही सुरक्षायंत्रणा किंवा आधाराशिवाय एका खोल विहिरीत फक्त हात-पायांच्या साहाय्याने शिवा उतरत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. शिवा पुन्हा तशाच पद्धतीने विहिरीत वर चढताना दिसतोय.

व्हिडिओत विहिरीच्या गोल भिंतींच्या दोन्ही कडांवर पाय पसरवून तो स्वतःला खाली-वर सरकवत असल्याचे दिसतेय. हा व्हिडिओ शिवाच्या इन्स्टाग्राम खात्यावरून (@shivazfitzone) प्रसिद्ध झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३० लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिलाय. लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊसही पडत आहे. इतकंच नव्हे, तर त्याचे इतरही अनेक व्हिडिओ आहेत, ज्यात तो बांबूवर लटकून कसरती करताना किंवा जड वजनासह शरीराचा तोल सांभाळताना दिसतो. दरम्यान, सोशल मीडियावर लोक शिवाच्या ताकदीचं आणि नियंत्रणाचं कौतुक करत आहेत. काहींनी मात्र ही कसरत धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकलखाली २ म्हशी आल्या; मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

kesar sabudana kheer: नवरात्रीसाठी फक्त १० मिनिटांत बनवा केशर साबुदाणा खीर, वाचा ही सोपी रेसिपी

Hingoli Crime : हिंगोलीमधील भांडेगाव गोळीबाराने हादरले; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Ghevar Recipe: नवरात्रीत देवीच्या नैवद्यासाठी खास बनवा राजस्थानी स्टाईल घेवर; सिंपल रेसिपी वाचा

Maharashtra Live News Update: २६ सप्टेंबरपासून मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT